शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

मराठवाड्यात कर्जमाफीचे १११६.४४ कोटी पडून; शेतकऱ्यांचे बँकांमध्ये खेटे घालणे सुरूच आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 6:58 PM

मराठवाड्यातील एकूण ११.२१ लाख अर्जदार शेतकऱ्यांपैकी ९.६१ लाख शेतकऱ्यांना ३ हजार ९७८.९२ कोटी रुपयांचा लाभ कर्जमाफीपोटी मिळाला आहे.  

ठळक मुद्देऔरंगाबाद व लातूर येथील विभागीय कार्यालयातील माहितीवरून हे वास्तव समोर आले आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण ११.२१ लाख अर्जदार शेतकऱ्यांपैकी ९.६१ लाख शेतकऱ्यांना ३ हजार ९७८.९२ कोटी रुपयांचा लाभ कर्जमाफीपोटी मिळाला आहे. याशिवाय १.५९ लाख शेतकऱ्यांना मंजूर झालेले १११६.४४ कोटी रुपये अजुनही बँकांच्या खात्यात पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे बँकांमध्ये खेटे घालणे सुरूच आहे. 

औरंगाबाद व लातूर येथील विभागीय कार्यालयातून माजी साखर सहआयुक्त के. ई. हरदास यांनी मिळविलेल्या माहितीवरून हे वास्तव समोर आले आहे. 

औरंगाबादेत १३३ कोटी बँकांमध्ये पडूनऔरंगाबाद जिल्ह्यातील दहा हजार लाभार्थी शेतकऱ्यांचे १३३ कोटी रुपये बँकेत पडून आहेत. मात्र जिल्हा बँकेने ४ कोटी रु. शासनाला परत केलेले आहेत, असे दिसून येते.  

जालन्यात ३६५ कोटी पडूनजालना जिल्ह्याला ९६०.३७ कोटी रु. मंजूर झाले. पण शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात फक्त ५९५.३५ कोटी रु.जमा झाले आहेत. तसेच ३६५.०२ कोटी रु. पूर्ततेअभावी बँकेच्या खात्यात पडून आहेत. ही टक्केवारी ४० टक्के इतकी आहे. त्यापैकी जिल्हा बँकेने ७०.०४ कोटी शासनाला परत करण्याची घाई केली.  

हिंगोली : २३९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरहिंगोली जिल्ह्यात प्राप्त २६०.७२ कोटींपैकी २३९.४३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचा दावा शासन व प्रशासनाकडून केला जात आहे. जिल्ह्यात ६६ हजार ३३९ शेतकऱ्यांना २६०.७२ कोटींची कर्जमाफी मंजूर झाली आहे.  २७८ शेतकऱ्यांचे दोन कोटी ३२ लाख रुपये शिल्लक आहेत. 

बीड : ७३७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर बीड जिल्ह्यातील १ लाख ५४ हजार ८७० शेतकऱ्यांना ७३७.०७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.  

लातूर जिल्ह्यात ३७८ कोटींची कर्जमाफीलातूर जिल्ह्यासाठी ५१६ कोटी २४ लाख रुपये कर्जमाफीसाठी प्राप्त झाले असून, लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या १ लाख ५२ हजार ७४० आहे. मात्र त्यापैकी १ लाख ३९ हजार ७९४ शेतकऱ्यांना ३७८.८२ कोटींची कर्जमाफी करण्यात आली आहे. जिल्ह्यात १२ हजार ९४७ शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. बहुदा हे शेतकरी वन टाईम सेटलमेंटच्या योजनेत येत असावेत, असा जिल्हा उपनिबंधकांचा अंदाज आहे. 

उस्मानाबाद : ८८ हजार ६४६ शेतकऱ्यांना लाभउस्मानाबाद जिल्ह्यातील ८८ हजार ६४६ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे़ या शेतकऱ्यांचे २९६ कोटी ६९ लाख रूपयांचे कर्ज माफ झाले आहे़ १२ हजार ८४६ लाभार्थी शेतकऱ्यांना मंजूर झालेले सुमारे १३०.४४ कोटी रूपये बँकेच्या खात्यात पडून आहेत.  

नांदेड :  १ लाख ३० हजार ३५३ शेतकऱ्यांच्या अर्जावर निर्णय नाहीनांदेड जिल्ह्यात १ लाख ३५ हजार ६४७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७०१ कोटी ८५ लाख रुपये जमा करण्यात आले आहे.  अर्ज भरलेल्या १ लाख ३० हजार ३५३ शेतकऱ्यांच्या कर्जमाफी अर्जावर शासनाने अद्याप निर्णय घेतलेला  नाही. दुसर वनटाईम सेटलमेंट योजनेला जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.  

परभणी : निम्म्या शेतकऱ्यांनाही मिळाला नाही लाभपरभणी जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ९०३ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे़ विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात ३ लाख शेतकरी आहेत़ जिल्ह्यात एकूण सातबाराधारक शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ४७ हजार असून त्यापैकी १ लाख ३४ हजार ९०३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर ७४५ कोटी ७३ लाख रुपये जमा झाले आहेत़ 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार