शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात नदी जोड प्रकल्प मार्गी लागणार; सहा अधिकाऱ्यांचा अभ्यास गट स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 19:26 IST

सतत दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यात इतर नद्यांच्या खोऱ्यातील पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाच्या दिशेने अखेर एक पाऊल पुढे पडले आहे.

औरंगाबाद : सतत दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यात इतर नद्यांच्या खोऱ्यातील पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाच्या दिशेने अखेर एक पाऊल पुढे पडले आहे. शासनाने या योजनेचा प्राधान्यक्रम, मापदंडाचा अहवाल तयार करण्यासाठी सहा अधिकाऱ्यांच्या अभ्यास गटाची स्थापना केली आहे.

मराठवाड्यात १० वर्षांमध्ये ३ वर्षे दुष्काळ, ३ वर्षे कमी पाऊस आणि ३ वर्षे जास्त पाऊस, असे चक्र दिसते. त्यामुळे मराठवाड्याला सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येला कायम सामोरे जावे लागत आहे. सतत दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनतो. त्यामुळे मराठवाड्यासाठी इतर प्रदेशातील म्हणजे विपुलतेच्या खोऱ्यातून पाणी वळविण्यासाठी प्रवाही वळण योजना, उपसा वळण योजनांचे (नदी जोड प्रकल्प) नियोजन करण्यात येत आहे. केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी नदी जोड प्रकल्प असून, याद्वारे दमनगंगेचे पाणी गोदावरीकडे वळविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे गोदावरी नदीला भरपूर पाणी राहणार असून, जायकवाडी धरणात जलसाठा वाढण्यास मदत होईल. 

नदी जोड प्रकल्प राबवून पावसाचे वाया जाणारे पाणी कसे वाचविता येईल, नद्यांतून समुद्रात जाणारे पाणी रोखण्यासाठी आगामी कालावधीत काम केले जाणार आहे. यामुळे मराठवाड्यासह तुटीच्या खोऱ्यातील पाणी प्रश्न मिटेल, अशी आशा व्यक्त होत आहे. निधी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने राबविण्यासाठी योजनेचा प्राधान्यक्रम ठरविणे आणि या योजनेसाठी मापदंड निश्चित होणे गरजेचे आहे. यासाठी अभ्यास गट स्थापन करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. अखेर १३ आॅगस्ट रोजी हा अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे. 

अभ्यास गटाचा कार्यकाळ १५ सप्टेंबरपर्यंततापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अभ्यास गटाचे अध्यक्ष आहेत. सदस्य म्हणून तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता, कोकण प्रदेशाचे मुख्य अभियंता, औरंगाबाद जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, नागपूर जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांचा समावेश आहे, तर नाशिक मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेचे अधीक्षक अभियंत्याची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या अभ्यास गटाचा कार्यकाळ १५ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. अभ्यास गटाचा अहवाल महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिक रणास ३१ आॅगस्टपर्यंत सादर केला जाईल.

पर्यावरणाचा अभ्यास व्हावानदी जोडसारखा नवीन प्रकल्प राबविताना पर्यावरणाचाही अभ्यास करण्याची गरज आहे. अभ्यास गटात केवळ अधिकाऱ्यांचाच समावेश आहे. अभ्यास गटामध्ये जल, पर्यावरण तज्ज्ञांचाही समावेश आवश्यक होता.- प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

टॅग्स :riverनदीMarathwadaमराठवाडाWaterपाणी