संजय जाधव , पैठणदारणा धरणातून जायकवाडी धरणासाठी गोदावरी पात्रात सोडलेले पाणी नाशिक ते पैठणदरम्यान असलेल्या १२ उच्चपातळी बंधाऱ्यात व अहमदनगर जिल्ह्यातील कालव्याद्वारे वळविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. १० हजार ५०० क्युसेक्सने तीन दिवसांपूर्वी सोडलेले पाणी केवळ एक हजार क्युसेक्सने दाखल होत आहे. मराठवाड्याचे हक्काचे पाणी अडविले जात असल्याने जायकवाडी धरणात नाममात्र पाणी दाखल होत आहे. एम.डब्ल्यू.आर.आर.ए. च्या (जलसंपत्ती नियामक प्राधिकरण) नियमास हरताळ फासण्यात येत दारणा धरणातून सोडलेले पाणी नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर प्रकल्पात जमा होऊन पुढे गोदावरी पात्रातून जायकवाडीकडे धावते. जायकवाडी धरणापर्यंत गोदावरी पात्रात १२ उच्चपातळी बंधारे आहेत. यात तांदळज, मजूर, दत्त, सागर, हिंगणा, डाऊख, सडे शिंगवी, पुणतांबा, नेऊर, वांजरगाव, खानापूर, कमळापूर या बंधाऱ्यांचा समावेश आहे. या बंधाऱ्यांचे दरवाजे १ जुलैनंतर उघडे ठेवणे बंधनकारक आहे; परंतु सर्वच बंधाऱ्यांच्या दरवाजात फळ्या टाकून आडकाठी निर्माण करण्यात आली.४या बंधाऱ्यांतच मोठ्या प्रमाणात पाणी अडविण्यात आले. नांदूर मधमेश्वर ते पैठण २६ तासात पोहोचणारे पाणी तब्बल ५२ तासांनी जायकवाडीत दाखल झाले.
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर पुन्हा दरोडा!
By admin | Updated: July 28, 2015 01:22 IST