शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याचा आवाज हरवला; प्रसिद्ध विधीज्ञ प्रदीप देशमुख यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 18:21 IST

अॅड देशमुख हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड या गावचे. त्यांनी एल.एल.बी केल्यानंतर बॅरिस्टर गाडगीळ यांचे ज्युनियर म्हणून मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय आरंभिला.

औरंगाबाद : प्रसिद्ध विधीज्ञ प्रदीप गोविंदराव देशमुख (वय-६७,रा. सिडको एन-२) यांचे शुक्रवारी निधन झाले. ते मराठवाडा जनता विकास परिषदेचे माजी अध्यक्ष होते व त्या माध्यमातून त्यांनी मराठवाडा विकासाचे अनेक प्रश्न लावून धरले होते. स्वतंत्र मराठवाडा राज्य स्थापन झाले पाहिजे, या मागणीचा ते सतत पुनरुच्चार करीत असत. औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. समन्यायी पाणी वाटपासाठी आणि मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी त्यांनी अनेक सार्वजनिक हित याचिका यशस्वीपणे चालविल्या. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि विधी क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत अनेकांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.

अॅड देशमुख हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड या गावचे. त्यांनी एल.एल.बी केल्यानंतर बॅरिस्टर गाडगीळ यांचे ज्युनियर म्हणून मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय आरंभिला. बॅरिस्टर गाडगीळ लोकसभेचे सदस्य झाल्यानंतर देशमुखही दिल्लीला गेले. ते तेथेच नोकरीला लागले. औरंगाबाद येथील वकिल संघाचे एक प्रतिनिधी मंडळ औरंगाबादला उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे म्हणून तत्कालीन पंतप्रधानांना निवेदन देण्यात करिता गेले होते. त्यावेळी देशमुख यांच्यामुळे बॅ. गाडगीळ यांनी त्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. आज सकाळी मुकुंदवाडी समशानभूमीत दिवंगत प्रदीप देशमुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या जनहित याचिका गाजल्या प्रदीप देशमुख हे जनहित याचिका दाखल करणारे वकील म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध पावले होते. मराठवाड्याला हक्काचे गोदावरीचे पाणी मिळायला पाहिजे म्हणून बऱ्याच याचिका उच्च न्यायालयात केल्या होत्या. ते मराठवाड्याच्या पाणी प्रश्ना करिता उच्च न्यायालयात एकटे लढले. कॉंग्रेसमध्ये असताना त्यांनी राजीव गांधी मित्र मंडळाची स्थापना केली होती. पुढे त्यांनी भाजप मध्ये प्रवेश घेतला होता. एक चांगला वक्ता अशी त्यांची ख्याती होती. 

टॅग्स :Deathमृत्यूMarathwadaमराठवाडा