शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यास पुन्हा अतिवृष्टीचा फटका; दोन हजार गावे बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:19 IST

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत हजेरी लावली. गेल्या सात दिवसांत दोन हजार गावांच्या परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस होत आहे. २९ ते ३० मे या दोन दिवसांतील २४ तासांमध्ये विभागातील बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील १५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद विभागीय आयुक्तालयाने घेतली आहे.

मागील २४ तासात बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा, चौसाळा आणि धारूर तालुक्यातील मंडलांमध्ये, तर धाराशिव जिल्ह्यात ग्रामीण, तुळजापूर तालुक्यातील सालगरा, परांडाच्या जवळा, भूमच्या माणकेश्वर, भूम, कळंबमधील इटकूर, मोहा, उमरग्याच्या डाळिंब, मुरूम, लोहारा आणि जेवळी मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.

जालना जिल्ह्यातील बेथलम येथील संदीप लक्ष्मण परळकर यांच्या मालकीची म्हैस वीज पडून दगावली. तर नसडगाव येथील कैलास साहेबराव मिसाळ यांच्या, गट नंबर १०७ शेतात दोन शेळ्या मृत झाल्या. याशिवाय भोकरदन तालुक्याच्या सोयगाव देवी येथे गट नंबर १६४ मधील प्रल्हाद यादवराव सहाणे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. सोयगाव देवी येथील गट नंबर १८१ मधील सुमित्रा गणपत सहाने यांची नवीन बांधलेली विहीर खचली. मागील २४ तासात ११.३ मिमी इतका पाऊस झाला. यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस धाराशिव जिल्ह्यात, तर बीडमध्ये २१ मिमी पाऊस झाला आहे.

मंडलनिहाय झालेला पाऊस (मिमी)

बीड- मांजरसुंबा ७५.२५चौसाळा ६७.७५धारूर             ६५.७५

धाराशिव            ग्रामीण            ६५.७५सालगरा ६७.००जवळा             ७३.५०माणकेश्वर ७३.५०भूम             ६७.७५लेट             ७७.७५इटकूर             ७५.५०मोहा             ६५.७५डाळिंब            ६५.५०मुरुम             ६५.५०लोहारा            ६७.००जेवळी             ६५.५०

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र