शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मराठवाडा बनले वैद्यकीय शिक्षणाचे हब; दरवर्षी घडत आहेत १ हजार ७५० नवे डॉक्टर

By संतोष हिरेमठ | Updated: March 10, 2025 12:51 IST

प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, खासगी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचीही स्पर्धा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा आता नवीन डाॅक्टर घडविणारी नगरी म्हणून उदयास येत आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. त्याबरोबर खासगी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचीही स्पर्धा सुरू झाली आहे. आजघडीला मराठवाड्यात दरवर्षी १ हजार ७५० नवीन डाॅक्टर घडत असून, आगामी काळात ही संख्या आणखी वाढेल.

मराठवाड्यात ८ शासकीय आणि ५ खासगी वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत असून, एकूण १ हजार ७५० वैद्यकीय जागांवर दरवर्षी प्रवेश दिला जातो. यामध्ये शासकीय आणि खासगी मिळून छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ४५० जागा उपलब्ध आहेत. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून दरवर्षी शेकडो विद्यार्थी डॉक्टर बनत आहेत.

वैद्यकीय शिक्षकांची संख्या वाढावीवैद्यकीय शिक्षक आणि तज्ज्ञांच्या मते, डॉक्टरांची संख्या वाढणे हा आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा असला, तरी दर्जेदार वैद्यकीय शिक्षण देणे तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी वैद्यकीय शिक्षकांची संख्या पुरेशी वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने प्राधान्याने प्रयत्न करण्याची गरज आहे.

मराठवाड्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये: जिल्हा- विद्यार्थी प्रवेश क्षमताछत्रपती संभाजीनगर - २००जालना-१००परभणी-१००हिंगोली-१००धाराशिव-१००नांदेड-१५०लातूर-१५०बीड- अंबेजोगाई-१५०

मराठवाड्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयेछत्रपती संभाजीनगर - २ (२०० व ५० जागा)जालना -१ (१५० जागा)परभणी-१ (१५० जागा)लातूर-१ (१५० जागा)

आणखी ३ खासगी महाविद्यालये वाढणारछत्रपती संभाजीनगरात आणखी ३ खासगी वैद्यकीय महाविद्यालये सुरू होण्याची चिन्हे आहेत. ही तिन्ही महाविद्यालये मिळून ४०० जागा वाढण्याचा अंदाज असून, त्यातून मराठवाड्यात नव्याने घडणाऱ्या डाॅक्टरांची संख्या वर्षाला २ हजारांवर जाईल.

डाॅक्टरांची संख्या वाढीस मदतमराठवाड्यात नव्याने निर्माण झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमुळे डाॅक्टरांची संख्या वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. गुणवत्तापूर्ण डाॅक्टर घडण्यासाठी या महाविद्यालयांमध्ये अधिकाधिक चांगल्या सुविधा, वैद्यकीय शिक्षक उपलब्ध करून दिले पाहिजे.- डाॅ. भारत सोनवणे, कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटना

सोयीसुविधा वाढीसाठी प्रयत्नशीलमराठवाड्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत वेळोवेळी भेट देऊन तेथील सोयीसुविधांचा आढावा घेतला जात आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मराठवाड्यातील आरोग्य सुविधा वाढीसाठी प्रयत्नशील आहे.- डाॅ. शिवाजी सुक्रे, सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय

टॅग्स :Marathwadaमराठवाडाdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीयchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर