औरंगाबाद : मराठवाड्यातील २२ तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपंचायती स्थापन करण्याची उद्घोषणा काँग्रेस आघाडी सरकारने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार नागरिकांकडून याबाबत ३० जूनपर्यंत हरकती आणि आक्षेप मागविण्यात आले आहेत. राज्यात अनेक तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी अजूनही ग्रामपंचायतीच आहेत. सुनियोजित विकासासाठी सर्व ठिकाणी नगरपंचायती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने फेबु्रवारी महिन्यातच घेतला. मात्र, त्यानंतर लगेचच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे ही प्रक्रिया रखडली होती. आता राज्य सरकारने याविषयी उद्घोषणा प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार नवीन नगरपंचायतींच्या स्थापनेच्या अनुषंगाने नागरिकांकडून ३० जूनपर्यंत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यात एकूण ७८ ठिकाणी नवीन नगरपंचायती अस्तित्वात येणार आहेत. तर मराठवाड्यात ही संख्या २२ इतकी आहे.
मराठवाड्यात २२ नवीन नगरपंचायती
By admin | Updated: June 2, 2014 01:33 IST