शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा पदवीधर निवडणुकीचा बिगुल वाजला; १ डिसेंबरला होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 16:47 IST

मराठवाड्यात आचारसंहिता २ नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजेपासून लागू झाली आहे. 

ठळक मुद्देकोरोनाचा प्रोटोकॉल सर्व राजकीय पक्षांना पाळावा लागणार आहे. कोरोनामुळे रेंगाळलेल्या या निवडणुकीसाठी १ डिसेंबरला मतदान होणार आहे.निवडणुकीसाठी सुमारे ३ लाख ५२ हजारांवर मतदार नोंदणी गेली आहे.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी बिगुल वाजला आहे. कोरोनामुळे रेंगाळलेल्या या निवडणुकीसाठी १ डिसेंबरला मतदान होणार आहे. मराठवाड्यात आचारसंहिता २ नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजेपासून लागू झाली आहे. 

मराठवाड्यात पदवीधर निवडणुकीसाठी सुमारे ३ लाख ५२ हजारांवर मतदार नोंदणी गेली आहे. यावेळी १२ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी सुरू राहणार असल्याचे विभागीय आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी बिगुल वाजला आहे. मतमोजणी केंद्र अजून ठरलेले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभा आणि प्रचार करण्यासाठी नियम आणि अटी आहेत. कोरोनाचा प्रोटोकॉल सर्व राजकीय पक्षांना पाळावा लागणार आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना मतदान करण्याबाबत अजून सूचना आलेल्या नाहीत. मतमोजणी केंद्र आणि मतदार केंद्र यासाठी आयोगाकडे परवानगी मागितली आहे.

यामुळे लागणार जास्तीचा खर्च मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराचे ऑक्सिजन प्रमाण तपासावे लागेल. मतपत्रिका देण्यापूर्वी मतदारांना हॅण्डग्लोज द्यावे लागतील. थर्मलगनद्वारे मतदारांचे तापमान तपासावे लागेल. मतदारांना सोशल डिस्टन्सिंगने मतदानासाठी उभे करावे लागेल. मतदान केंद्रावर कर्मचारी प्रशिक्षण देण्यासाठी खर्च लागेल. मतदान केंद्र वाढवावे लागतील. त्यामुळे खर्च वाढेल. तसेच पीपीई कीट प्रत्येक केंद्रावरील कर्मचाऱ्याला द्यावी लागेल. सॅनिटायझरचा वापर करावा लागेल. मतपत्रिका सॅनिटाईज करून छापाव्या लागतील. केंद्रावर कर्मचारी नेण्यासाठी वाहनांची संख्या वाढवावी लागेल. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी इतर प्रशासकीय खर्चही लागेल. 

असा आहे निवडणूक कार्यक्रमकोरोनामुळे रेंगाळलेल्या या निवडणुकीसाठी १ डिसेंबरला मतदान होणार आहे. आचारसंहिता २ नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजेपासून लागू झाली आहे. ५ नोव्हेंबरला निवडणूक अधिसूचना निघेल. १२ नोव्हेंबर रोजी उमेदवारांना अर्ज भरणे शक्य होईल, १३ नोव्हेबर रोजी अर्ज छाननी केली जाईल. १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ७ डिसेंबरपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक अनुषंगाने विभागातील मतदान केंद्र व सहायकारी मतदान केंद्रासह ८१३ मतदान केंद्रांचे ठिकाण, मतदान केंद्र स्थित असलेल्या इमारतीचे नाव, मतदान केंद्राची व्याप्ती निश्चित करण्यात आलेली आहे. विभागात साडेतीन लाख मतदार आहेत.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस