शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात ३४ टक्के पेरणी पूर्ण; नांदेड जिल्हा आघाडीवर तर उस्मानाबाद सर्वात मागे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:53 IST

खरिपाच्या पेरणीचा पहिला महिना संपत आला असून, मराठवाड्यात १६ लाख ५३ हजार २०० हेक्टर (३३.६६ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

ठळक मुद्दे यंदा सर्वाधिक ५९.१४ टक्के पेरणी सोयाबीनची  झाली तर कपाशीची ३७.१९ टक्के झाली आहे.    

औरंगाबाद : खरिपाच्या पेरणीचा पहिला महिना संपत आला असून, मराठवाड्यात १६ लाख ५३ हजार २०० हेक्टर (३३.६६ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात ५३.६२ टक्के पेरणी करून नांदेड जिल्हा आघाडीवर असून सर्वात कमी २३.११ टक्के पेरणी उस्मानाबाद जिल्ह्यात झाली आहे. यंदा सर्वाधिक ५९.१४ टक्के पेरणी सोयाबीनची  झाली तर कपाशीची ३७.१९ टक्के झाली आहे.    

जोरदार सलामी देणारा पाऊस मध्यंतरी गायब झाला. यामुळे  पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र, महिन्याच्या उत्तरार्धात पुन्हा वरुणराजाचे आगमन झाल्याने पेरणीने जोर धरला आहे. मराठवाड्यात ४९,१०,९०० हेक्टरपैकी १६,५३,२०० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणीत नांदेड जिल्हा नंबर वन राहिला. हिंगोली जिल्ह्यात ५३.२२ टक्के, औरंगाबाद ३२.९२ टक्के, बीड २९.०० टक्के, परभणी २८.३४ टक्के, जालना २३.५८ टक्के, लातूर २३.७३ टक्के पेरणी पूर्ण झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात २३.११ टक्के पेरणी झाली. 

पेरणीमध्ये जालना, लातूर व उस्मानाबाद पिछाडले आहेत. १०,३८,८०० हेक्टरपैकी ६,१४,३०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. यातही नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर  जिल्ह्यांत सोयाबीनची पेरणी अधिक आहे. तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात  ५१०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मागील वर्षी शेंद्री बोंडअळीच्या उद्रेकाने झालेले मोठे नुकसान लक्षात घेता यंदा शेतकरी कापूस कमी प्रमाणात लावतील, असा अंदाज कृषी विभागाने खरीप हंगाम बैठकीत व्यक्त केला होता. मात्र, नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांचा ओढा कपाशीकडेच असल्याचे आतापर्यंतच्या पेरणीवरून दिसते आहे. मराठवाड्यात १७,१७,४०० हेक्टरपैकी ६,३८,७०० हेक्टरवर (३७.१९ टक्के) कपाशीची लागवड झाली आहे. त्यातही लातूर विभागात ३७.१९ टक्के तर औरंगाबाद विभागात ३२.३९ टक्के कापसाची लागवड झाली आहे. पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत पेरणी १०० टक्क्यांपर्यंत जाईल, अशी शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. 

ढगाळ वातावरण, तुरळक-मध्यम पाऊस वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सांगितले की, मराठवाड्यात १ जुलैपर्यंत ढगाळ वातावरण राहील. काही भागात तुरळक व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. ७५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला असल्यास, जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून पिकाची पेरणी करावी.

टॅग्स :FarmerशेतकरीMarathwadaमराठवाडाagricultureशेती