शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात पावसाच्या खंडामुळे खरिपाचे ३५ % उत्पादन घटणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 13:35 IST

मराठवाड्यात ६० टक्क्यांच्या आसपास पाऊस होऊनही खरीप हंगामाचे उत्पादन ३५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता

औरंगाबाद : मराठवाड्यात ६० टक्क्यांच्या आसपास पाऊस होऊनही खरीप हंगामाचे उत्पादन ३५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता कृषी विभागाने एका अहवालानुसार विभागीय आयुक्तांकडे वर्तविली आहे. ३१ आॅगस्टपर्यंत विभागातील पाऊस तसेच पिकांच्या परिस्थितीचा आढावा घेणारी माहिती कृषी विभागाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे दिली आहे. 

गेल्या वर्षी बोंडअळीमुळे खरिपाचे नुकसान झाले. यंदाही बोंडअळी आणि खोड किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट वाढले आहे. विभागातील ७९९ मि. मी. पावसाच्या तुलनेत आजवर ४७२.५० मि. मी. इतका पाऊस झाला असून, पावसाळ्याच्या ९२ दिवसांपैकी ५२ दिवस कोरडे गेले आहेत. हे अलीकडच्या तीन वर्षांतील सर्वाधिक खंड प्रमाण आहे. पावसाच्या खंडामुळे कापूस व मक्यासह इतर सर्व पिकांच्या उत्पादनाला ३० ते ३५ टक्के फटका बसणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. औरंगाबाद, बीड आणि काही प्रमाणात जालना जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सारखीच आहे.

गेल्या वर्षी कापसाचे पीक बोंडअळीने पोखरले. परिणामी यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी उसाचा पर्याय निवडला आहे. ज्यांनी यंदाही कापसाची लागवड केली, त्या शेतकऱ्यांच्या पदरी बोंडअळीमुळे नुकसान येण्याची शक्यता वाढली आहे. पावसाच्या खंडामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या केल्या. १५ लाख हेक्टरवर यंदाच्या हंगामात कापसाची प्रत्यक्ष पेरणी झाली. पावसाअभावी आणि किडीमुळे कापूस उत्पादनात ३० ते ३५ टक्के घट होणे शक्य आहे. कीड व बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

४ लाख ४६ हजार हेक्टरवर तूर लागवड करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यातील पावसामुळे तुरीचे पीक वाढले असले तरी उत्पादनावर परिणाम होणे शक्य आहे. मूग व उडीद पिकांच्या उत्पादनात तब्बल ५० ते ६० टक्के  तर सोयाबीनच्या उत्पादनात २५ टक्के  घट होईल. औरंगाबाद जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसणार आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी खरीप हंगामातील उत्पादनावर पावसाअभावी परिणाम होणे शक्य असल्याचे सांगितले.

खरिपात ९ हजार कोटींची गुंतवणूक मराठवाड्याचे खरीप पिकाखालील क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्टर असून, त्यापैकी ४४ लाख १९ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. हेक्टरनिहाय पीक पेरणीच्या खर्चाच्या अंदाजानुसार खरीप हंगामात नांगरणी, पेरणी, मजुरी, बियाणे, खतांच्या खरेदीसाठी करण्यात आलेली अंदाजे ९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी