शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी मराठवाडयातील ९ हजार कोटींच्या गुंतवणुकीवर पाणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 12:32 IST

मराठवाड्यात अपेक्षेपेक्षा  कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामाची दुबार पेरणी करणेही अवघड असून, येणारा उन्हाळा त्रासदायी ठरणार आहे.

औरंगाबाद : मराठवाड्याचे खरीप पिकाखालील क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्टर असून, त्यापैकी ४४ लाख १९ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. सुमारे ९ हजार कोटींची गुंतवणूक शेतकऱ्यांनी या हंगामात केली होती. या हंगामाचे उत्पादन पावसाअभावी निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. पुढच्या १० दिवसांत खरीप हंगामाच्या आणेवारीबाबत निर्णय होण्याची माहिती विभागीय प्रशासनाने दिली. 

हेक्टरनिहाय पीकपेरणीच्या खर्चानुसार अंदाज बांधला, तर खरीप हंगामात नांगरणी, पेरणी, मजुरी, बियाणे, खतांच्या खरेदीसाठी करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर पावसाअभावी पाणी फेरले गेले आहे. मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात ६३.६८ टक्के पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात ५३ टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्यात अपेक्षेपेक्षा  कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामाची दुबार पेरणी करणेही अवघड असून, येणारा उन्हाळा त्रासदायी ठरणार आहे. आता पाऊस झाला तरी त्याचा फायदा खरिपाला होणार नाही. 

कृषी खात्यानुसार विभागात मका २ लाख ३५ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. कापूस १४ लाख ३२ हजार हेक्टर (बोंडअळीच्या संकटाने पीक धोक्यात), तूर ४ लाख ३३ हजार हेक्टर,  मूग १ लाख ६२ हजार हेक्टर, उडीद १ लाख ४५ हजार हेक्टर, सोयाबीन १७ लाख ५१ हजार हेक्टर, बाजरी १ लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली. आणेवारीनंतर या पिकांचे काय नुकसान झाले आहे, याची माहिती समोर येईल.

१५ ते २० हजारांचा हेक्टरी खर्च - नांगरणीसाठी हेक्टरी खर्च -२,५०० रुपये - मोगडण्यासाठी - १,२५० रुपये- चरी पाडण्यासाठी - १,२५० रुपये- बियाणांची बॅग हेक्टरी सरासरी खर्च - ५ हजार रुपये- निंदणी करण्यासाठी  हेक्टरी खर्च - ३ हजार ७५० रुपये- १०:२६ च्या खतांच्या दोन बॅगा हेक्टरी लागल्या- शिवाय युरिया आणि फवारणीचा खर्च वेगळा. - वखरण्यासाठी १,२५० रुपये हेक्टरी खर्च झाला आहे. -अंदाजे ४ वेळा शेतकऱ्यांनी वखरणी केली आहे.या सगळ्या खर्चाची गोळाबेरीज केली, तर सरासरी १५ ते २० हजार रुपये हेक्टरी खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. एकरी कापूस लावण्यासाठी हजारो रुपयांचा चुराडा केला आहे, पावसाने दगा दिल्यामुळे खरीप हंगाम संपुष्टात आला. 

विभागीय महसूल उपायुक्त म्हणाले...मराठवाड्यातील खरीप हंगामाबाबत जिल्हा समितीचे अहवाल येत आहेत. ते अहवाल आल्यानंतर शासनाच्या एका अध्यादेशाच्या अधीन राहून आणेवारीबाबत विचार होईल. येत्या १० दिवसांत आणेवारीबाबत निर्णय होईल, असे प्रभारी महसूल उपायुक्त शिवानंद टाकसाळे यांनी सांगितले.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र