शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मराठवाड्यात सहा महिन्यांत ६२ जण लाच घेताना जाळ्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 19:24 IST

लाचखोरी कमी होत नसल्याचे चित्र, लुबाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

ठळक मुद्देदक्ष नागरिकांच्या भूमिकेमुळे खाबूगिरांना लाचलुचपत विभागाने जाळ्यात पकडले

औरंगाबाद :  भ्रष्टाचार हटावचा नारा नवा राहिलेला नाही, देशाचे पंतप्रधान यांनी देखील ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ असा भाषणातून दमदार उल्लेख केला; परंतु इच्छा नसताना एकमेकांना कुरतडण्याचे काम सातत्याने बिनबोभाटपणे सुरूच असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यात आवघ्या सहा महिन्यांत ६२ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 

लोकांच्या इच्छेविरुद्ध गळचेपी करून त्यांच्याकडून पैसा लुबाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होत आहे. शासकीय यंत्रणेत महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, आरोग्य, शिक्षण, बांधकाम विभाग, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका तसेच शासकीय कार्यक्षेत्रात येणाऱ्या कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांवर खातरजमा करीत जाळे टाकले जाते. अनेकदा हेतुपुरस्सर किंवा खोडसाळपणे कुणी प्रयत्न करते का, याची शहानिशा करण्यासाठी शासकीय व खाजगी पंचासमक्ष पडताळणी करूनच सापळा रचला जातो. फिर्यादी आणि लाचखोर यांच्या समन्वयानुसार एसीबी आपला सापळा लावते. 

अनेकदा चोरपंक्चर असल्यास सापळे फेल ठरतात, तर सापळ्यात एक सहकारी अडकला तरी दुसरा सावधानतेची भूमिका घेण्याऐवजी बिनधास्त खाबूगिरी चालू ठेवतो; परंतु दक्ष नागरिकांच्या भूमिकेमुळे अशा खाबूगिरांना लाचलुचपत विभागाने जाळ्यात पकडले आहेत. कारवाईकडे अनेकदा दुर्लक्ष करीत पुन्हा सवयीप्रमाणे जाऊ तिथं खाऊ अशीच अवस्था पाहण्यास मिळते. कारवाईनंतर अनेक जण घरी गेले आणि अनेकांच्या शासनदरबारी फेऱ्या सुरू आहेत; परंतु एखाद्याला गंभीर सजा झाल्यास कदाचित खाबूगिरीची वृत्ती कमी होणार नाही. भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासनाच्या कक्षेत विविध यंत्रणा काम करीत असून, लवकर आणि झटपट कामासाठीची भूमिका, हव्यास टाळल्यास सामान्य व्यक्तींना नाहक होणारा त्रास टळू शकतो.

जानेवारी ते जून २०१९ या सहा महिन्यांत मराठवाड्यात ६२ सापळे यशस्वी झाले आहेत. जालना जिल्ह्यात २०, औरंगाबाद १७, बीड १२, उस्मानाबाद १३ असे सहा महिन्यांतील चित्र आहे, तर जानेवारीत मराठवाडाभर या विभागाने ८, फेब्रुवारी १२, मार्च ९, एप्रिल ९, मे १३, जून ११ सापळे यशस्वी झाले आहेत. 

नागरिकांनी पुढे यावे...भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद कार्यालयाशी संपर्क साधावा.- डॉ. श्रीकांत परोपकारी, पोलीस अधीक्षक 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसArrestअटकMarathwadaमराठवाडा