शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

मराठा सेवा संघ महाअधिवेशनाची जय्यत तयारी

By admin | Updated: December 17, 2015 00:20 IST

नांदेड : मराठा सेवा संघाच्या स्थापनेला २५ वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त अकोला येथे महाअधिवेशनाची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांनी पत्रपरिषदेत दिली.

नांदेड : मराठा सेवा संघाच्या स्थापनेला २५ वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त अकोला येथे महाअधिवेशनाची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांनी पत्रपरिषदेत दिली. रौप्य महोत्सवी अधिवेशन २४,२५ व २६ डिसेंबर रोजी होत असून त्यात मनोरंजन, प्रबोधन, महिला व युवकांचे विविध प्रश्न यासह अनेक जाती जमातींच्या ३१ संघटनांचे प्रदेश प्रतिनिधी एकाच विचारमंचावर दिसणार आहेत. या अधिवेशनासाठी राज्यभरातून १ लाख लोक येणार आहेत़ २४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता अकोला शहरातून मिरवणुकीने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. २५ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.पुरुषोत्तम खेडेकर हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तर युवराज छत्रपती संभाजी राजे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे, महसुलमंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची उपस्थिती राहणार आहे.स्वागताध्यक्ष पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील राहणार आहेत. डॉ.रुख्माबाई राऊत आरोग्य कक्षातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. दुपारच्या सत्रात आयपीएस, आयएएस अधिकारी मार्गदर्शन करतील. उपस्थितांच्या मनोरंजनासाठी चित्रपट, टि.व्ही.नाटक,कलाकारांचा सहभाग असलेल्या संगीत रजनी होणार आहे़ २६ रोजी शाहिरांचे पोवाडे, प्रसिद्ध सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराजांची सत्यवाणी होणार आहे़ दुसऱ्या सत्रात प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रारबाहेरील मराठा समाज व त्यांचा समन्वय या विषयावर विचारमंथन होणार आहेत. समारोप दुपारी ३ ते ६ या वेळेत वसंतराव बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली होत असून बी. जी. कोळसे पाटील, शिवराज महाराज, बद्रीनाथ महाराज तनपुरे, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, पत्रकार ज्ञानेश महाराव आदी उपस्थित राहतील. नांदेड जिल्ह्यातून १५०० समाजबांधव जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी इंजि. शिवाजीराजे पाटील, प्रा. डॉ. गणेश शिंदे, इंजि. शे. रा. पाटील, व्ही. डी. शिंदे, डॉ. सुरेश कदम, सदाशिव पाटील, पंडीत कदम, पंडित पवळे, श्यामसुंदर शिंदे, जिल्हाध्यक्ष सोपानराव क्षीरसागर आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)