शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरुणाचा फेसबूक लाइव्ह करून आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 20:26 IST

Maratha Reservation Update : मराठा आरक्षण न्यायालयीन लढाईत अडकले आहे. त्यामुळे मराठा समाजात असंतोष आहे.

औरंगाबाद - मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असणारी सुनावणी आता ५ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे मराठा समाजात पुन्हा एकदा असंतोष वाढू लागला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी औरंगाबादमधील क्रांती चौकात मराठा संघटनांचे आंदोलन सुरू असून, या ठिकाणी मराठा समाजातील एका तरुणाने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने तीव्र आंदोलन करून मुक मोर्चे काढल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र सध्या हे आरक्षण न्यायालयीन लढाईत अडकले आहे. त्यामुळे मराठा समाजात असंतोष आहे. दरम्यान, आज औरंगाबादमधील क्रांती चौकात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. त्या ठिकाणी दत्ता भोकरे या तरुणाने फेसबूक लाइव्ह करत मराठा आरक्षाची मागणी केली. तसेच विषप्राशन केले.दरम्यान, या तरुणाला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेऊन उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनादरम्यान, तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtraमहाराष्ट्र