शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

'आरक्षण रद्दनंतर शासनाकडून दिलासा नाही'; मराठा समाजाचा घरावर काळे झेंडे लावून राजकारण्यांच्या विरोधात संताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 15:22 IST

Maratha Reservation : ५ मे  रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करणारा निर्णय दिला. तेव्हापासून मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचे नेते परस्परांवर आरोप करीत आहेत.

ठळक मुद्देकोव्हीड संसर्गामुळे रस्त्यावर उतरुन आंदोलन  करणे सध्या शक्य नाही.

औरंगाबाद: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देणारा एकही निर्णय शासनाने घेतला नाही. उलट  परस्परांवर आरोप करण्यात व्यग्र असलेल्या राजकारण्यांच्या  निषेधार्थ मराठा समाजाने आजपासून स्वतःच्या घरावर काळे झेंडे लावण्यास सुरुवात केली.

५ मे  रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करणारा निर्णय दिला. तेव्हापासून मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचे नेते परस्परांवर आरोप करीत आहेत. आरक्षणाचा कायदा मजबूत नव्हता यामुळे तो टिकला नाही असे राज्यसरकार म्हणत आहेत. तर कायद्याची बाजू मांडण्यात राज्यसरकार कमी पडल्यामुळे आरक्षण रद्द झाले असे भाजपचे नेते म्हणत आहेत. एकमेकांवरील कुरघोडीच्या राजकारणासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षानी  मराठा आरक्षणाचा बळी घेतल्याची चर्चा सध्या मराठा समाज करीत आहेत. 

यामुळे मराठा समाजात   त्यांच्याविषयी प्रचंड रोष निर्माण झाला  आहे. कोविड  संसर्गामुळे रस्त्यावर उतरुन आंदोलन  करणे सध्या शक्य नाही. ही बाब लक्षात  घेऊन  मराठा  क्रांती मोर्चाचे स्थानिक  समन्वयक  आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या उपस्थितीत आज राजकारण्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आजपासून घरावर काळे झेंडे लावण्यास सुरुवात केली. काळे कपडे घालून स्वतः च्या घरावर पाटील यांनी काळा झेंडा लावला. यासोबत त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत  समाजानेही स्वतःच्या घरावर काळे झेंडे लावून  निषेध व्यक्त करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अभिजीत देशमुख, मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक आप्पासाहेब कुढेकर, ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांची उपस्थिती होती. 

घरावर काळा झेंडा लावून निषेध घरावर काळे झेंडे लावून करत असलेला हा निषेध न्यायालयाविरोधात नाही. मराठा आरक्षणासाठी सरकारने अजूनही काही पर्यायी व्यवस्था केली नाही.  शिवाय त्यांच्या हालचालीही दिसत नसल्याने आम्हाला नाईलाजाने निषेध व्यक्त करावा लागत आहे. कोरोनाच्या या महामारीमुळे आम्ही रस्त्यावर उतरणार नाही. एक-  एक प्राण सर्वांसाठी महत्वाचा आहे. मराठा समाजाने  स्वतःच्या घरावर काळा झेंडा लावून निषेध व्यक्त करावा.- विनोद पाटिल, याचिकाकर्ता. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtraमहाराष्ट्र