शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शिवसंग्राम-शिवसैनिकांत राडा, मेटेंना शिवीगाळ; मराठा आरक्षण बैठक शिवसैनिकांनी उधळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 06:54 IST

औरंगाबादमधील घटना : मराठा आरक्षण बैठक शिवसैनिकांनी उधळली

औरंगाबाद : मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने गुरुवारी आयोजित बैठकीत शिवसैनिकांनी राडा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार विनायक मेटे यांना शिवीगाळ करून त्यांचे भाषण बंद पाडले. तसेच यावेळी बैठकीच्या संयोजकांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात  शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान सरकारच्या गुंडांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आ. मेटे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

शिवसंग्राम संघटनेचे शहराध्यक्ष उमाकांत माकणे यांनी मराठा  आरक्षण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पडेगाव आणि मिटमिटा येथील मराठा समाजातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. आ. मेटे हे या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. बैठकीत आ. मेटे बोलत असताना शिवसेनेचे कार्यकर्ते अंबादास म्हस्के, किसन घनवट, नवनाथ मुळे, राहुल यलची, सचिन घनवट यांच्यासह पाच ते सहा जण तेथे दाखल झाले.

या कार्यकर्त्यांनी आ. मेटे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मेटेंनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. मात्र शिवसैनिक त्यांच्या अंगावर धावून जाऊ लागले. यावेळी डॉ. अभिमन्यू उमाकांत माकणे यांनी त्यांना हॉलमधून बाहेर जाण्यास सांगताच त्यांना मारहाण करण्यात आली.    या घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. याविषयी डॉ. अभिमन्यू माकणे यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. 

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना