शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : 'सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन'च्या डॉ. काबरा विरूध्द मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 17:16 IST

Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधी याचिका दाखल करणाऱ्या 'सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन'ला फंडिंग केल्याचा आरोप

ठळक मुद्देडॉ. काबरा यांच्या रुग्णालयात मराठा क्रांती मोर्चाचे लोक जाणार असल्याचे कळताच पोलिसांनी आंदोलनापूर्वीच बंदोबस्त लावला. कार्यकर्ते येताच पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. यावेळी एक मराठा,लाख मराठा, डॉक्टर काबरा विरोधात घोषणा देण्यात आल्या.

औरंगाबाद: मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल करणाऱ्या 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' चळवळीला फंडिंग केल्याचा आरोप करीत डॉ. प्रवीण काबरा यांना काळे फासण्यासाठी आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या ९ पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. काबरा हॉस्पिटल येथे हे आंदोलन झाले.

सुनील कोटकर, रवि कळे, ज्ञानेश्वर गायकवाड, संजय सावंत, भरत कदम , संतोष गायकवाड, गणेश उगले पाटील , निलेश ढवळे , पंढरीनाथ गोडसे , दत्तात्रेय घारे  अशी आंदोलनकर्त्यांची नावे आहेत. याविषयी सुनील कोटकर आणि रवींद्र काळे यांनी सांगितले की, मराठा समाज सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा शांतताप्रिय समाज आहे. असे असतांना मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत आरक्षण मिळाल्यावर 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' ही चळवळ उभी राहिली. या चळवळीतर्फे नागपूर खंडपीठ येथे मराठा आरक्षण विरोधी याचिका दाखल केली. ऐवढेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरण होते. तेव्हा आरक्षणाला विरोध करणाऱ्यामध्ये 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'ची  याचिका होती. त्यांनी लाखो रुपये खर्चून मराठा आरक्षणाला विरोध केला. यामुळे आरक्षणाचा कायदा रद्द झाला. 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'ला आर्थिक रसद पुरविणाऱ्या लोकांची यादी आमच्या हाती लागली. औरंगाबाद शहरातील काबरा हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण काबरा यांचा यात समावेश आहे. यामुळे आज मराठा क्रांती मोर्चातर्फे त्यांना जाब विचारून काळे फासणार होता. आम्ही आंदोलंकर्ते त्यांच्या हॉस्पिटलजवळ असतांना पोलिसांनी आम्हाला पकडले. 

पोलिसांनी नोंदविला गुन्हा महेशनगर येथील डॉ. काबरा यांच्या रुग्णालयात मराठा क्रांती मोर्चाचे लोक जाणार असल्याचे कळताच पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, फौजदार हारुण शेख, हवालदार सानप, राठोड आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनापूर्वीच बंदोबस्त लावला. कार्यकर्ते येताच पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. यावेळी एक मराठा,लाख मराठा, डॉक्टर काबरा विरोधात घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यावर गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा