शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Maharashtra Bandh : मराठा समाजाचे आंदोलन चिघळलं, तीन आंदोलकांचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 13:56 IST

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी मराठवाड्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाची धग कायम आहे.

औरंगाबाद  -मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी मराठवाड्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाची धग कायम आहे. सोमवारी (23 जुलै) आंदोलनादरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात काकासाहेब शिंदे (26 वर्ष) या तरुणानं नदीत जलसमाधी घेतल्यानं मराठा समाजाचे आंदोलन चिघळले आहे. दरम्यान, आज या आंदोलनादरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या आणखी तीन कार्यकर्त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कन्नड तालुक्यात गुड्डू सोनावणे (33 वर्ष) या आंदोलकानं नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत गुड्डू गंभीर जखमी झाले आहेत. देवगांव रंगारी येथील ही घटना आहे. गु़ड्डू सोनावणे यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  तर जगन्नाथ सोनावणे (वय 55 वर्ष) नावाच्या आंदोलकानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

लातूरमध्ये आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्नमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान मंगळवारी (24 जुलै) सकाळी शिवाजी चौक येथे एका आंदोलकानं अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन त्यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. दरम्यान, शहर व जिल्ह्यात सर्वत्र बंद आंदोलन शांततेत सुरू असताना शिवाजी चौकात घडलेल्या घटनेमुळे पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. या आंदोलकाला ताब्यात घेतल्यानंतर  मराठा समाजाच्या अन्य कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर ठिय्या मांडला.

तरुणाने घेतली जलसमाधी 

औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे गोदावरी नदीत सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. सोमवारी (23 जुलै)सकाळी 10 वाजता ठिय्या आंदोलन सुरू झाले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी गोदावरी नदीवरील पुलाच्या मध्यभागी धाव घेतली. तेथे पोलीस व आंदोलकांमध्ये वाद झाला. गोंधळातच काकासाहेब दत्तात्रय शिंदे (वय 26 वर्ष) यानं दुपारी आरक्षणासाठी घोषणाबाजी करत पाण्यात उडी घेतली. पोहता न आल्यामुळे तो 200 मीटर वाहून गेला. स्थानिक मच्छिमारांनी त्याला बाहेर काढले. तातडीनं रुग्णवाहिकेतून गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

महाराष्ट्र बंदची हाक  

दरम्यान, या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चानं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मराठा क्रांती मोर्चानंमहाराष्ट्र बंदची हाक दिली असली, तरी यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. आंदोलकांनी बसेसवर दगडफेक करू नये, अशा सूचना समन्वयकांनी दिल्या आहेत. वारकरी पंढरपूरहून परतत असल्यानं त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून या सूचना देण्यात आल्या आहेत.  सातारा, सोलापूर, पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तर बुधवारी (25 जुलै) मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गेलेल्या वारकऱ्यांना घरी परतण्यास अडथळा ठरू नये, म्हणून  सातारा,  पंढरपूर, पुणे आणि मुंबईला महाराष्ट्र बंदमधून वगळण्यात आले असल्याची माहिती मराठा मूक मोर्चा समन्वयक विरेंद्र पवार यांनी दिली आहे.  

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद