शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 21:27 IST

मराठा आरक्षणासाठी औरंगाबद येथे काकासाहेब दत्तात्रय शिंदे (वय 28) या तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन जीव दिला.

औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी औरंगाबद येथे काकासाहेब दत्तात्रय शिंदे (वय 28) या तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन जीव दिला. त्यानंतर संतप्त मराठा आंदोलकांनी रास्ता रोको करत आंदोलन आणखी तीव्र केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्याशिवाय काकासाहेब यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही. अशी भूमिका येथील मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांनी घेतली आहे. 

मराठा आरक्षणासाठी औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.  आज दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान औरंगाबाद - नगर रोडवरील कायगाव येथे गोदावरी पात्रावरील पुलावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी पुलावरून नदीपात्रात उडी घेतली. त्यांना काही मच्छीमारांनी पात्रातून बाहेर काढले. त्यानंतर गंगापूर येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

या आंदोलनाची सुरुवात सकाळी 10 वाजता सुरु करण्यात झाली. प्रथमतः या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरु झाले होते. यानंतर आंदोलकांनी गोदावरी नदीवरील पुलाच्या मध्यभागी धाव घेतली.यावेळी त्यांची या ठिकाणी तैनात तैनात पोलिसांसोबत वादावादी झाली. यामुळे एकच गोंधळ उडाला,यातच काकासाहेब दत्तात्रय शिंदे याने नदी पात्रात उडी घेतली. यावेळी तेथे उपस्थित जमावाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाहजोरात असल्याने काकासाहेब हे जवळपास 200 मीटर अंतरावर वाहत गेले.  ग्रामरक्षक दलाचे दशरथ बिरुटे यांनी त्याला प्रवाहातून काढून काठावर नेले. यानंतर त्याला गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ही माहिती गंगापूर तालुक्यात वाऱ्यासारखी बाजारपेठ बंद करण्यात आली. तसेच आंदोलकांनी नगर रोडवर रास्तारोको आंदोलन सुरु केले आहे. नगर रोडवर मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी रास्तारोको केले असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

निवेदन देऊन दिला होता इशारा गंगापूर तालुक्यातील सकल मराठा समाजातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी   मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले होते. यात त्यांनी सोमवारी (दि. २३ ) कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून उडी मारून सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबाद