शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा क्रांती मोर्चा एल्गार; क्रांतीचौकात चिंतन आंदोलनाला प्रारंभ

By बापू सोळुंके | Updated: February 23, 2025 15:40 IST

मराठा आरक्षणासह अन्य प्रमुख मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चासह मराठा समाजातील विविध संघटनांनी एकत्र येत पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे.

छत्रपती संभाजीनगर:मराठा आरक्षणासह अन्य प्रमुख मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चासह मराठा समाजातील विविध संघटनांनी एकत्र येत पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. या सर्व संघटनांनी रविवारपासून क्रांतीचौकात चिंतन आंदोलन सुरू केले. ठोक माेर्चाचे रमेश केरे पाटील यांनी उपोषण सुरू केले. यांतर्गत मराठा आरक्षणासाठी सरकारने आजपर्यंत काढलेल्या जी.आर. आणि परिपत्रकांचे प्रदर्शन लावण्यात आले. शिवाय राेज सायंकाळी पीपीटीद्वारे मराठा समाज आरक्षणासाठी कसा पात्र आहे याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण द्यावे, बार्टीप्रमाणे सारथीला सर्व सवलती देण्यात याव्यात, अण्णासाहेब  पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना व्याज परतावा देण्यात यावा,  मराठा समाजाला ईडब्ल्यूएस  आरक्षण लागू करावे, आदी मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने  २३ फेब्रुवारीपासून मराठा आरक्षण चिंतन आंदोलनाचा इशारा आठ दिवसापूर्वी दिला होता. या इशाऱ्याची शासनाने दखल न घेतल्याने आजपासून क्रांतीचौकात प्रत्यक्ष आंदोलनाला सुरवात झाली.

एक मराठा लाख मराठा, जय भवानी, जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचं, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,आदी घोषणा देत दुपारी १२ वाजता उपोषणाला सुरवात झाली. या आंदोलनात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष रमेश केरे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात समन्वयक राजेंद्र दाते पाटील, रवींद्र काळे पाटील, राहुल पाटील, शैलेश भिसे,नीलेश डव्हळे, सोमनाथ मगर, विजय ोगरे,गणेश थोरात,प्रदीप नवले,नितीन पाटील पाटील, मनीष जोगदंडे आदींनी सहभाग नोंदविला. 

मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. राज्यसरकारने सन २०१९मध्ये मराठा समाजाला ईएसबीसी आरक्षण दिले होते. हे आरक्षण राज्य मागासवर्ग आयोग नेमून देण्यात आले होते. मात्र सरकारने कोर्टात योग्य बाजू न मांडल्याने ते सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले. या निर्णयावर राज्यसरकारने क्युरेटीव पिटिशन दाखल केलेली आहे. हे आरक्षण टीकावे यासाठी चांगला वकील नेमून सरकारने ते आरक्षण टिकविणे आवश्यक आहे. राज्यसरकारने दिलेले एसईबीसी आरक्षण आज जरी लागू असले तरी ते एका समितीच्या शिफारसीवर देण्यात आले आहे. यामुळे हे आरक्षणही न्यायालयात टीकणार नाही, मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण हवे आहे.- रमेश केरे पाटील, उपोषणकर्ते.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर