औरंगाबाद : मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच औरंगाबादच्या दौऱ्यावर आलेले उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी औरंगाबाद, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले. ‘हा पहिलाच प्रयत्न होता, मी सर्वांचे म्हणणे ऐकूण घेतले आणि शक्य तेवढे प्रश्न जागेवरच सोडविले. समस्या तातडीने कशा निकाली निघतील, यावर यापुढे बारकाईने लक्ष असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.परभणी जिल्ह्यातील पाथ्रीत साई बाबांचे जन्मस्थान आहे. त्याचा विकास करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात येणार आहे. शुक्रवारी मराठवाड्यातील उर्वरित चार जिल्ह्यांतील विकास कामांचा ते आढावा घेतील. औरंगाबादच्या नवीन पाणीपुरवठा योजनेबाबत नगरविकास विभाग तीन दिवसांमध्ये महाराष्टÑजीवन प्राधिकरणाला यासंदर्भात पत्र देणार आहे. आठ दिवसांत याकामाची वर्क आॅर्डर संबंधित कंपनीला देण्यात येईल, असे ठाकरे यांनी सांगितले.हर्सूल येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी पुनर्निविदा काढण्याचे आदेश देण्यात आले.९० दिवसांमध्ये उर्वरित प्रकल्पपूर्ण करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले.>औरंगाबादेत होणार कन्व्हेंशन सेंटरडीएमआयसीअंतर्गत उभारण्यात येणाºया शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रियल पार्कमध्ये ५०० एकर जमिनीवर 'अन्न प्रक्रिया केंद्र' (फुडपार्क) उभारण्यात येणार असून त्याचे भूमीपुजन जून २०२० मध्ये होईल. पार्कमध्ये १०० एकरवर महिला उद्योजकांसाठी आरक्षण असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी जाहीर केले. मराठवाडा असोसिएशन आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अॅण्डग्रीकल्चर (मसिआ) आयोजित चार दिवसीय अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
मराठवाड्यातील शक्य तेवढे प्रश्न जागेवरच सोडविले - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 06:06 IST