शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

बनावट वेबसाइटद्वारे लाखोंची फसवणूक; नागरिक फसत गेले, सायबर पोलिस दुर्लक्ष करत राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:43 IST

पतसंस्थेची बनावट वेबसाइट, सोशल मीडियावर सात पेज; कर्जाच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : अलखैर बैतूल माल नागरी सहकारी पतसंस्थेच्या नावे एक बनावट वेबसाइट व सोशल मीडियावर सात विविध पेजेस तयार केले गेले. याद्वारे अज्ञातांनी अनेकांना कर्ज देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातला. वर्षभरापासून सुरू असलेल्या प्रकरणात फसवणूक वाढतच चालल्याने अखेर बुधवारी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पतसंस्थेचे व्यवस्थापक सय्यद हबीबउल्लाह (५१) यांनी तक्रार दाखल केली. सदर संस्था त्यांच्या सभासदांना सोने तारण ठेवून बिगरव्याजी कर्ज देते. सभासदांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीला कर्ज मिळत नाही व कुठला व्यवहारही केला जात नाही. वर्षभरापूर्वी एका व्यक्तीची सोशल मीडियाद्वारे याच पतसंस्थेच्या नावे कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक झाली. त्याने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. जून, २०२४ मध्ये कय्युम नजमुद्दीन मुल्लाजी यांनी पतसंस्थेत धाव घेतली. पतसंस्थेचा कर्मचारी असल्याचे आयकार्ड, इतर कागदपत्रे पाठवून त्यांचीदेखील २० हजार रुपयांची फसवणूक झाली होती. सदर आरोपी अनेकांना बनावट वेबसाइट, पेजद्वारे संपर्क साधून संस्थेमधून कर्ज देण्याचे आमिष दाखवत होता. त्यासाठी त्यांच्याकडून इन्शुरन्स फी, लोन चार्जेस, असे विविध कारण सांगून पैसे उकळत होता. जानेवारी, मार्चमध्ये अशाच प्रकारे फसवणूक झालेल्या दोघांनी पतसंस्थेत धाव घेतली होती.

अगदी बिहारपर्यंत घातला गंडामार्च, २०२४ मध्ये बिहारच्या प्रसाद नामक व्यक्तीलादेखील अशाच प्रकारे ८ हजारांना फसवले गेले. रशीद अहमद फारुख अहमद चौधरी यांना १७ लाख रुपयांस फसवले गेले.

सायबर पोलिसांचा बेजबाबदारपणा, अर्ज चौकशीविनाच पडून राहिलेफसल्या गेलेल्या अनेकांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, इतर अर्जांप्रमाणे त्यांच्याही अर्जाकडे दुर्लक्ष करत सायबर पोलिसांनी बनावट वेबसाइट, सोशल मीडियावरील पेजेसवर कुठलीही कारवाई केली नाही. परिणामी, आरोपींचा विश्वास वाढत गेला व नागरिक त्यात फसत गेले. सायबर पोलिसांकडे प्राप्त अशा अनेक अर्जांची चौकशीच होत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. अनेक प्रकरणात अक्षरशः सहा ते सात महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येतो.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर