शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अनेक जागा पडून, आर्थिक स्थिती बिकट; तरी मनपा घेणार कोट्यवधींची जागा विकत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:33 IST

महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, असे वारंवार सांगण्यात येते. अशा परिस्थितीत कोट्यवधी रुपये खर्च करून भूखंड खरेदीच्या प्रस्तावामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर : गजानन महाराज मंदिराजवळील कडा कार्यालयाची पाच हजार चौरस फूट जागा विकत घेण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. रेडीरेकनर दरानुसार जागेची किंमत कोट्यवधींमध्ये जाईल. एवढी किंमत देण्याची तयारीही प्रशासनाने सुरू केली असून, कडा कार्यालयासोबत पत्रव्यवहारसुद्धा सुरू करण्यात आला आहे. हा भूखंड एका संकुलासाठी घेण्यात येत असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, असे वारंवार सांगण्यात येते. अशा परिस्थितीत कोट्यवधी रुपये खर्च करून भूखंड खरेदीच्या प्रस्तावामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शहरात महापालिकेच्या मालकीच्या अनेक जागा आहेत. या जागा सोडून ‘कडा’च्या जागेवर नेमके कोणते संकुल उभारायचे आहे, हे गुलदस्त्यात आहे. महापालिकेतील अधिकारी, कर्मचारीसुद्धा भूखंड खरेदीच्या मुद्यावर उघडपणे बोलायला तयार नाहीत.

महापालिकेच्या मालमत्ता विभागाने भूखंड खरेदीचा प्रस्ताव तयार केला असून, सध्या तो नगररचना विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. अंदाजे ५ कोटी रुपये या जागेची किंमत निश्चित होईल. प्रस्तावात रस्ता व कमर्शिअल वापरासाठी जागा हवी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नगर रचना विभागातर्फे जागेची किंमत अंतिम केल्यानंतर पुढील व्यवहार होण्याची शक्यता आहे.

बांधकाम व्यावसायिकांची सोय?महापालिका कडा कार्यालयाकडून पाच हजार चौरस फुटांचा भूखंड घेतल्यावर काही जागा रस्त्यासाठी देणार आहे. कडा कार्यालयाजवळ एका बांधकाम व्यावसायिकाच्या प्रकल्पाला मोठा रस्ता नाही. त्याच्या सोयीसाठी हा सर्व खटाटोप सुरू असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे.

नियमानुसार कारवाईमहापालिकेने पाच हजार चौरस फूट जागेची मागणी संकुलासाठी केली आहे. नियमानुसार हा प्रस्ताव मंडळासमोर ठेवण्यात येईल. ठराव झाल्यानंतर शासकीय दरानुसार पैसे भरण्यासंदर्भात मनपाला प्रस्ताव दिला जाणार आहे.- समाधान सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, कडा

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका