शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

विजेसाठी अनेक जण ‘आत्मनिर्भर’; औरंगाबादमधील ३२ हजार छतांवर होतेय वीज निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 15:44 IST

वीज बिलाची कटकटच नको, औरंगाबाद शहरात वर्षभरात तीन कोटी युनिट विजेची निर्मिती

 - संतोष हिरेमठऔरंगाबाद : शहरात तब्बल ३२ हजार वीज ग्राहकांना वीज बिलाचे टेन्शनच राहिलेले नाही. कारण हे ग्राहक सौरऊर्जेच्या माध्यमातून छतावरच वीज निर्मिती करीत आहेत. या ग्राहकांकडील छतावरील प्रकल्पातून वर्षभरात तब्बल तीन कोटी ४७ लाख ८८ हजार युनिट विजेची निर्मिती झाली. यात एक कोटी २२ लाख १७ हजार युनिट महावितरणला देण्यात आले.

वीज बिल म्हटले की, अनेकांना ते किती येईल, याचे टेन्शनच येते. परंतु सौरऊर्जेमुळे विजेसाठी अनेक जण आत्मनिर्भर झाले आहेत. सौरऊर्जा निर्मितीसाठी जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे या योजनेला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, सौरऊर्जेचा वापर करण्याकडे कल वाढतच आहे. त्यामुळे महावितरणच्या शहर मंडळात सौरऊर्जा ग्राहकांची संख्या वाढत आहे.

किमान ११ कोटी रुपयांची वीज निर्मितीसौरऊर्जेतून वर्षभरात ३ कोटी ४७ लाख ८८ हजार ४४८ युनिटची वीज निर्मिती झाली. ३.३६ रुपये हा युनिट दर पकडला तरी ११ कोटी ६८ लाख ८९ हजार १८५ रुपयांची वीज निर्मिती झाली, तर १ कोटी २२ लाख १७ हजार ०२६ युनिटनुसार महावितरणाला किमान ४ कोटी १० लाख ४९ हजार २०७ रुपयांची वीज देण्यात आली. सौरऊर्जा प्रकल्प बसवूनही निर्मितीपेक्षा अधिक विजेचा वापर किंवा प्रकल्पातील बिघाडामुळे अनेक ग्राहकांना महावितरणकडून वीज घ्यावी लागते.

किती मिळते अनुदान ?केंद्र शासनाकडून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रुफटॉप) सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी वित्त साहाय्य देण्यात येत आहे. यात घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत ,परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान मिळणार आहे.

यंत्रणा उभारणीचा खर्च तीन वर्षांत परतया यंत्रणेला महावितरणकडून लावण्यात आलेल्या नेटमीटरिंगद्वारे वर्षाअखेर सर्वच वर्गवारीतील ग्राहकांकडून शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जात आहे. त्याचाही आर्थिक फायदा संबंधित घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना होतो. सोबतच सौर प्रकल्पातून निर्माण झालेल्या विजेच्या स्वयंवापरामुळे वीज बिलात होणारी बचत तसेच शिल्लक वीज याचा एकत्रित लाभ विचारात घेता यंत्रणा उभारणीच्या खर्चाची साधारणतः ३ ते ५ वर्षांत परतफेड होत असल्याचे सांगितले जाते.

ऑनलाईन करता येतो अर्जसौरऊर्जेच्या योजनेसाठी ‘ऑनलाईन’ अर्ज व संपूर्ण माहितीसाठी https://www.mahadiscom.in/ismart/ या लिंकद्वारे स्वतंत्र वेबपोर्टल उपलब्ध करण्यात आले आहे. या योजनेविषयक संपूर्ण माहिती व ‘ऑनलाईन’ अर्जाची सोय, मार्गदर्शक तत्त्वे, सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरे, आदींची माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शहरातील उपविभागनिहाय सौरऊर्जा ग्राहक व वर्षभरातील वीज निर्मिती

उपविभाग-ग्राहक-निर्यात केलेले युनिट-आयात केलेले युनिट-निर्माण केलेले युनिट्स-औरंगाबाद पाॅवर हाऊस- २,६६५- ११,८४,०७१- १८,९०,३६५- ३०,६३,६२९-छावणी उपविभाग- ६,४०१- २४,३६,७२२- ३८,५०,५३३- ६१,२२,३८०-शहागंज उपविभाग- २,८४३- १०,७९,७९१- १३,४७,६५२- ३७,९२,८६१-वाळूज उपविभाग-१,६०३- ८,५४,१२०- ४०,७१,४९७- ४०,३५,२७७-सिडको उपविभाग- ३,६४१- १०,६९,६५५- १४,८२,६८१- ३०,०२,७९४-चिकलठाणा उपविभाग-५,२४१- २१,०९,५०२- ३४,७६,०५२- ५९,३०,४७०-गारखेडा उपविभाग- ६,०६०- १८,८२,६९१- २२,७४,२८४- ४६,६५,८७७-क्रांतीचौक उपविभाग- ४,०६९- १६,००,४७४- २२,९६,८०९- ४१,७५,१६०एकूण- ३२,५२३- १,२२,१७,०२६- २,०६,८९,८७३- ३,४७,८८,४४८

ग्राहकांनी खबरदारी घ्यावीसौरऊर्जेचा वापर महत्त्वपूर्ण ठरत आहे. सौरऊर्जेचा एक-एक युनिट वापरला गेला पाहिजे. सौरऊर्जा प्रकल्प बसविताना ग्राहकांनी थोडी काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही भूलथापांना बळी पडता कामा नये. विजेच्या वापरानुसार प्रकल्प बसविण्यास प्राधान्य दिले पाहिजे.- भुजंग खंदारे, मुख्य अभियंता, महावितरण

वीज बिलापासून सुटकासौरऊर्जा प्रकल्प बसविण्यापूर्वी महिन्याला ७ ते ८ हजार वीज बिल येत होते. परंतु, सौरऊर्जा प्रकल्पामुळे आता बिल भरण्याची वेळच येत नाही. ऑनलाईन बिल चेक केले तरी काही रक्कम दाखवत नाही.- लक्ष्मीकांत शहाणे, सौरऊर्जा ग्राहक

शहरातील वीज ग्राहक :-घरगुती- २,९७,२६३-व्यावसायिक- ३५,०९३-औद्योगिक- ६,५२६-पाणीपुरवठा- ४६-दिवाबत्ती- १,५२५-शेती पंप- २,१३२- उच्च दाब- ६४२-इतर- २,२००-एकूण वीज ग्राहक- ३,४५,,४२७

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण