शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा डांबर प्लांट

By admin | Updated: December 18, 2015 23:46 IST

औरंगाबाद : रस्त्यांचे खोदकाम केल्याच्या बदल्यात केबल कंपन्या, व्यक्ती आणि संस्थांकडून दिलेली रक्कम केवळ रस्ता दुरुस्तीसाठीच वापरली जावी यासाठी महापालिकेने स्वतंत्र बँक खाते सुरू केले आहे.

औरंगाबाद : रस्त्यांचे खोदकाम केल्याच्या बदल्यात केबल कंपन्या, व्यक्ती आणि संस्थांकडून दिलेली रक्कम केवळ रस्ता दुरुस्तीसाठीच वापरली जावी यासाठी महापालिकेने स्वतंत्र बँक खाते सुरू केले आहे. तसेच पॅचवर्कची कामे वेळीच करता यावीत याकरिता स्वत:चाच डांबर तयार करण्याचा प्लांट उभा करण्याचा प्रस्ताव मनपाच्या विचाराधीन आहे. शहरातील रस्त्यांची चाळणी झाली आहे. तरीही तिजोरीत पैसे नसल्यामुळे मनपाकडून आतापर्यंत पॅचवर्कची कामे होऊ शकलेली नाहीत. ही बाब लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने आता स्वतंत्र बँक खाते सुरू केले आहे. यापुढे रस्त्यांचे खोदकाम केल्याच्या बदल्यात विविध केबल कंपन्या, व्यक्ती आणि संस्थांनी जमा केलेली रक्कम या खात्यात टाकून ती रस्ता दुरुस्तीसाठीच वापरली जाणार आहे. याशिवाय पॅचवर्कर्ची कामे वेळीच करता यावीत यासाठी महापालिका स्वत:चा डांबर तयार करण्याचा प्लांट उभारण्याचाही विचार करीत आहे. सध्या रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात पॅचवर्क ची थातुरमातुर कामे करण्यात आली; परंतु काही दिवसात हे खड्डे पुन्हा उखडले. रस्ते दुरुस्तीसाठी तसेच खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदार अनेक कारणे सांगून टाळाटाळ करतात, तर कधी कधी पूर्वीची थकलेली बिले मिळाली नसल्याने ते काम करण्यास तयार होत नाहीत. म्हणून भविष्यात अशी कामे करण्यासाठी डांबर तयार करण्याचा प्लांट सुरू करण्याचा महापालिकेचा विचार आहे. त्यासाठी सुमारे ६० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्लांट सुरू झाला तर वेळीच कामे करणे शक्य होणार आहे.