शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगेंचे रुग्णालयातच बैठकांचे सत्र; दसरा मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 17:34 IST

छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील बैठकांना समाजबांधवांची गर्दी

छत्रपती संभाजीनगर: बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे आयोजित दसरा मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केली आहे. मेळाव्याची तयारी करण्यासाठी जरांगे यांनी रुग्णालयातच बैठकांचे सत्र सुरू केले आहे.आज मंगळवारी दुपारी त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठका घेतल्या.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील  यांनी वर्षभरात सहा उपोषण केल्यानंतरही मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी शासनाने पूर्ण केली नाही. एवढेच नव्हे तर आंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर नोंदविण्यात आलेले गंभीर स्वरुपाची गुन्हे अद्याप परत घेतले नाही. यामुळे मराठा समाज राज्यसरकारविरोधात आक्रोश व्यक्त करीत आहेत. यापार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे नारायणगड येथे  १२ ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा घेत आहे. या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने जनसमुदाय एकत्र आणून मराठा समाजाचे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचे जरांगे यांनी ठरविले आहे. नऊ दिवसांच्या उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली होती. यामुळे चार दिवसांपासून ते शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. डाॅक्टरांनी त्यांना आणखी आठ ते दहा दिवस आराम करण्याचा आणि उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.असे असताना जरांगे यांनी मंगळवारी रुग्णालयाच्या पार्किंग हॉल मध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील मराठा सेवकांच्या स्वतंत्र दोन बैठका घेतल्या.  हा मेळावा सर्व समाजाचा आणि अराजकीय आहे. प्रत्येक गावांतून जास्तीत जास्त समाजबांधवांनी मेळाव्याला येण्याचे आवाहन त्यांनी केले. 

समाजाची एकजूट दाखविण्याची योग्य संधी बैठकांना मार्गदर्शन करताना जरांगे म्हणाले,  नारायणगड येथे आयोजित दसरा मेळावा हा अराजकीय मेळावा आहे. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर समाजाची एकजूट दाखविण्याची योग्य वेळी योग्य संधी मिळाली आहे. प्रत्येक गावांतून स्वतंत्र वाहनांने महिला आणि पुरूष मंडळींनी नारायणगड येथे यायचे आहे. दुपारी २ पूर्वी हा मेळावा संपून आपआपल्या घरातील सण साजरा करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद