शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मनोज दादा मला पाडण्याचे आदेश देता, आमचे काय चुकले? अपक्ष उमेदवाराची माघारीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 16:09 IST

अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी फेसबुक लाईव्ह करून निवडणुकीतून केली माघारीची घोषणा

फुलंब्री : मनोज दादा तुम्ही मला पाडण्याचे आदेश देताय, ही माझ्यासाठी दु:खदायक बाब आहे. मी समाजाच्या हितासाठी अनेक गुन्हे अंगावर घेतले. प्रामाणिकपणे काम करीत असताना आमचे नेमके काय चुकले? आपल्या निर्णयामुळे प्रचाराचे नारळ फोडण्याची तयारी करीत असताना आता मी निवडणुकीतून माघार घेतोय, अशी घोषणा फेसबुक लाईव्हद्वारे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी बुधवारी सायंकाळी ५ वाजता मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून केली.

गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी मागील काही वर्षांपासून केलेली आंदोलने चर्चेची झाली आहेत. यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केली. जालना लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढविली. यात त्यांना एकूण दीड लाख मते मिळाली होती. त्यांना सर्वाधिक म्हणजे ४१ हजार ३४३ मते सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती तर फुलंब्री मतदारसंघातून ३९ हजार ३८३ मते मिळाली होती. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीतही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी अनेकवेळा जरांगे यांची भेट घेतली होती.

ग्रामस्थांसमोर तयार केला व्हिडीओफुलंब्री विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणारे मंगेश साबळे यांनी बुधवारी गावात ग्रामस्थांना सोबत घेऊन एक सायंकाळी ५ वाजता फेसबुक लाईव्ह केले. त्यात ‘मी अपक्ष निवडणूक लढवित असतानासुद्धा मनोज दादा मला तुम्ही पाडण्याचे आदेश देता, ही बाब मला समजणारी नाही. तुमच्या आदेशामुळे मी निवडून येणार नाही. त्यामुळे निवडणुकीतून ताघार घेतो, अशी घोषणा केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकphulambri-acफुलंब्रीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील