शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; १० वीचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता 
3
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
4
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
5
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
6
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
7
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
8
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
9
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
10
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
11
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
12
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
13
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
14
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
15
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
16
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
17
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
18
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
19
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
20
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?

सेव्हनहिल उड्डाणपुलाखाली भरदिवसा लुटले पादचारी महिलेचे मंगळसूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:29 IST

रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतो, असे सांगून हात धरून वर्दळीचा जालना रोड ओलांडून पुलाखाली नेऊन ५८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील चार ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र एका चोरट्याने हिसकावून नेले. सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवरील सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली बुधवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास झालेल्या धाडसी लुटीने शहरात खळबळ उडाली.

ठळक मुद्देरस्ता ओलांडून देण्यासाठी मदत करण्याची थाप मारून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र नेले हिसकावून

औरंगाबाद : रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतो, असे सांगून हात धरून वर्दळीचा जालना रोड ओलांडून पुलाखाली नेऊन ५८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील चार ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र एका चोरट्याने हिसकावून नेले. सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवरील सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली बुधवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास झालेल्या धाडसी लुटीने शहरात खळबळ उडाली.प्राप्त माहिती अशी की, सिंदोन-भिंदोन येथील रहिवासी अनुसयाबाई शिंदे (५८) यांना पिसादेवी येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी जायचे होते. यामुळे त्या गावाहून औरंगाबादेत आल्या. गजानन महाराज मंदिराकडून त्या सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळ आल्या आणि जालना रोड ओलांडण्यासाठी रिक्षा थांब्याजवळ उभ्या होत्या. यावेळी आकाशवाणीकडे जाणाऱ्या काही रिक्षाचालकांनी त्यांना ‘चला आई, कुठे जायचे’ असे विचारले. तेव्हा त्यांनी मला पिसादेवीकडे जायचे आहे, असे सांगितले. तेथे उभ्या दोन आरोपींनी हे ऐकले. एक जण त्यांच्याजवळ आला आणि ‘आजी तुम्हाला कुठे पळशीला जायचे आहे ना, चला रस्ता ओलांडून देतो’, असे म्हणत त्याने अनुसयाबाई यांचा हात धरला. रस्ता ओलांडण्यासाठी तरुण मदत करीत असल्याचे पाहून त्यांना खूप बरे वाटले आणि त्या नि:संकोचपणे त्याच्यासोबत जालना रोड ओलांडून सेव्हन हिल पुलाखालून जाऊ लागल्या. याचवेळी मजबूत शरीरयष्टी असलेला एक जण अचानक त्यांच्याजवळ आला आणि त्याने अनुसयाबाई यांच्या गळ्यातील चार ग्रॅमचे सोन्याचे मणीमंगळसूत्र हिसका देत तोडले. चोरटा आणि अनुसयाबाई यांना मदत करणारा तो तरुण, असे दोघेही सुराणानगरच्या दिशेने सुसाट पळून गेले. यावेळी अनुसयाबाई यांनी चोर, चोर, अशी आरडाओरड करीत त्यांच्यामागे पळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना कळविली. याविषयी जिन्सी पोलीस ठाण्यात मंगळसूत्र चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.पोलिसांची घटनास्थळी धावमाहिती मिळताच गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, जिन्सी ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक तुषार देवरे आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयांची तपासणी केली. काही ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेºयांत चोरटे कैद झाले असून, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी