शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांशी नडणारा अडकला! दोन तासात सस्पेंड करण्याची धमकी देणारा अखेर पोलीस कोठडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 22:39 IST

पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटेंची कठोर भूमिका

छत्रपती संभाजीनगर : सुसाट वेगात व्हीआयपी सायरन वाजवत जात वाहतूक पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून सस्पेंड करण्याची धमकी देणाऱ्या कुणाल बाकलीवाल ला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. शिवाय, त्याची महागडी डिफेंडर गाडी देखील जप्त केली आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटेंनी रविवारी अधिकाऱ्यांची कानउघडणी करत सक्त कारवाईचे आदेश दिले. 

वाहतूक शाखेचे अंमलदार दैनसिंग जोनवाल हे सहायक फौजदार बागूल यांच्यासह २४ जानेवारी रोजी सायंकाळी मिल कॉर्नर सिग्नलवर कर्तव्यावर होते. यावेळी बाकलीवाल व्हीआयपी सायरन वाजवत महागड्या डिफेंडर गाडीत जात होता. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केल्याचा राग आल्याने बाकलीवाल ने चौकाच्या मधोमध गाडी (एम एच २० -जीके -१८१९) थांबवली. अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत हुज्जत घालत 'तू पहेचनता नही क्या, मै कोन हूँ, असे म्हणत बागूल यांना 'बुढ्ढे तेरेको ड्युटी करने आती क्या, माझ्या नादी लागू नको' असे म्हणत सर्वांना दोन तासांत सस्पेंड करतो, असे धमकावले.

लोकमत ने एनसी वर सर्वप्रथम घेतला आक्षेप

भर चौकात सर्वसामान्यांसमोर पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला. सर्वसामान्यांच्या बाबतीत थेट सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांनी याप्रकरणी केवळ अदखलपात्र (एनसी) दाखल केली. लोकमत ने या संदर्भात सर्वप्रथम रविवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी याची गंभीर दाखल घेत एनसी दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. आधी सस्पेंड ची धमकी, चोवीस तासात पोलीस कोठडीत   

मोठ्या माणसांच्या नावाने पोलीस कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्याची धमकी देणारा बाकलीवाल २४ तासात पोलीस कोठडीत होता. एनसी नंतर त्याच्यावर बीएनएस कलम १३२,३५२,३५१(२) सह मोटर वाहन कायदा १९८८ चे कलम १००(२)/१७७, ११९(२)/१७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सहायक पोलिस धनंजय पाटील, निरीक्षक सुनील माने, सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी तत्काळ बाकलीवाल ला घरातून बेड्या ठोकल्या. त्याच्यावर शिवाय, व्हीआयपी सायरन असलेली महागडी डिफेंडर गाडी देखील जप्त केली. बाकलीवालची रात्री मेडिकल तपासणी करण्यात आली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद