शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

वंचित बहुजन आघाडीत माळी समाजाला हव्यात ५० जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 19:28 IST

१५ सप्टेंबर रोजी अरणला सत्तासंपादन मेळावा 

ठळक मुद्देसध्या माळी समाजाचे १२ आमदार आहेत

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीकडून माळी समाजाला विधानसभेच्या ५० जागा हव्या आहेत. महाराराष्ट्रातत माळी समाजाची संख्या दोन कोटी आहे. आता ८० टक्के समाज वंचित बहुजन आघाडीकडे वळला आहे. नाशिक भागातला २० टक्के समाज छगन भुजबळ यांच्याकडे असू शकतो. सध्या माळी समाजाचे १२ आमदार आहेत; परंतु युती शासनात अलीकडेच फक्त एक मंत्री बनवण्यात आला आहे. एकूणच वंचितांना व माळी समाजाला वंचित बहुजन आघाडीकडूनच न्याय मिळू शकेल, असा विश्वास बुधवारी येथे सर्वशाखीय माळी समाज सत्तासंपादन महामेळाव्याचे प्रमुख संयोजक व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला. 

अरण, जि. सोलापूर या संत सावता महाराजांच्या गावी हा महामेळावा १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यासंबंधीची सविस्तर माहिती लिंगे यांनी दिली.अरण येथे सुमारे एक लाख माळी समाज बंधू-भगिनी जमतील. वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करतील. माळी समाजाला शासनकर्ती जमात बनविणे, जातनिहाय जनगणना करणे, सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अ वर्ग दर्जा, पर्यटन क्षेत्राचा दर्जा, सावता महाराजांच्या नावाने वनौषधी संशोधन केंद्र स्थापन करणे, संविधान बचाव, आरक्षण संरक्षित करणे या मुद्यांवर महामेळाव्यात चर्चा होईल. पत्रपरिषदेस रामभाऊ पेरकर, गौतम क्षीरसागर, शिवाजी गाडेकर, बाबासाहेब पवार, हरिभाऊ पवार यांच्यासह माळी समाज बांधव उपस्थित होते. 

लेना ना देना.... बीजेपी सेना...पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सांगितले की, सध्याचे सरकार वंचितांना न्याय देऊ शकत नाही. प्रश्न सोडवू शकत नाही. लेना ना देना... बीजेपी सेना अशी यांची अवस्था आहे. ६० टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. त्यातही आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाच्या कपातीचा निर्णय शासनाने घेतला आहे. सेव्ह मेरिट... सेव्ह नेशनच्या आंदोलनाची दखल घेऊन  ओबीसींना वैद्यकीय आरक्षण २ टक्केच देण्याचा  निर्णय केंद्राने घेतला आहे. शेतकऱ्यांना हमी भाव नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्या सुरू आहेत.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीvidhan sabhaविधानसभाAurangabadऔरंगाबाद