उपमहापौर पदाच्या निवडीवरून शिंदेसेनेमध्ये नाराजी नाट्य रंगले. उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यातील सुप्त संघर्षाच्या ठिणग्या उडताना दिसल्या. हा वाद आणखी वाढताना दिसत असून, राजेंद्र जंजाळ यांच्या समर्थकांनीच संजय शिरसाट यांच्या गाडीसमोर गोंधळ करत मोठमोठे गार केले गंमतमध्ये अशा घोषणा देत डिवचले.
महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या आधी राजेंद्र जंजाळ समर्थक महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आले आणि त्यांनी जोरजोरात घोषणा दिल्या. गुलाल उधळत जंजाळ समर्थकांनी शिरसाटांना डिवचले.
शिरसाट आणि जंजाळ यांच्यात वादाची ठिणगी का?
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजपाने दणदणीत यश मिळवले. ५६ जागा भाजपाला मिळाल्या. बहुमतासाठी एका जागेची गरज असताना भाजपाने शिंदेसेनेला सोबत घेतले.
शिंदेसेना सत्तेत सामील झाली. त्यासाठी भाजपाने शिंदेसेनेला उपमहापौरपद दिले. शिरसाट यांना उपमहापौर पद त्यांच्या गटातील माजी महापौर त्र्यंबक तुपे यांना द्यायचे होते. त्यासाठी शिरसाटांनी प्रयत्न केले. पण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुख जंजाळांना पुढे केले. त्यामुळे शिरसाटांची नाराजी झाली आणि संघर्ष सुरू झाला.
'जिसका गुरू बलवान चेला पैलवान', असे बॅनर जंजाळ समर्थकांकडून शिरसाटांसमोर झळकावण्यात आले.
कमबॅक, मोठमोठे गार केले गंमतमध्ये... कुणाच्याही नादी लाग, आमच्या नादी लागू नको, महागात पडेल. अशा घोषणा करणारे बॅनरही शिरसाटांना दाखवण्यात आले.
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कारसमोरच जंजाळ समर्थकांनी जल्लोष केला. दरम्यान, महापौरपदी समीर राजूकर आणि उपमहापौर पदी राजेंद्र जंजाळ यांची नावे जाहीर करण्यात आली, तेव्हा पालकमंत्री संजय शिरसाट हे अनुपस्थित होते.
Web Summary : Shinde Sena infighting erupts over deputy mayor election. Supporters of Rajendra Janjal protested against minister Sanjay Shirsat, chanting slogans and displaying banners criticizing him for favoring another candidate. Shirsat was absent during the announcement of the mayoral and deputy mayoral candidates.
Web Summary : उपमहापौर चुनाव को लेकर शिंदे सेना में कलह। राजेंद्र जंजाल के समर्थकों ने मंत्री संजय शिरसाट के खिलाफ नारे लगाए और उन पर दूसरे उम्मीदवार का समर्थन करने का आरोप लगाया। महापौर और उपमहापौर उम्मीदवारों की घोषणा के दौरान शिरसाट अनुपस्थित थे।