शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'आमच्या बदल्या करा'; पंधरा दिवसात दोन अधिकाऱ्यांना मारहाणीनंतर पैठणमध्ये कर्मचारी उद्विग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 19:22 IST

अधिकाऱ्यावर हात उचलण्यापर्यंत या समाजकंटकाची मजल पोहचली आहे.

पैठण: पाणीटंचाई बैठकीत तहसीलदार पैठण यांना झालेली अरेरावी व कार्यालयात घुसून जि प च्या उपविभागीय अभियंत्यास मारहाण झाल्यानंतर पैठण तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संरक्षण देता येत नसेल तर आमच्या बदल्या करा व आम्हाला येथून जाऊ द्या अशा शब्दात विविध कर्मचाऱ्यांनी आपली उद्विग्नता उपविभागीय अधिकाऱ्या समोर शुक्रवारी व्यक्त केली.

शासकीय काम करत असताना कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामाशी हितसंबंध नसलेले, गुंडगिरी करून दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकाकडून अरेरावी पैठण तालुक्यात वाढली आहे. प्रसंगी अधिकाऱ्यावर हात उचलण्यापर्यंत या समाजकंटकाची मजल पोहचली आहे. तहसीलदार सारंग चव्हाण हे आंतरवाली खांडी ता. पैठण येथे पाणीटंचाईची बैठक घेत असताना गावातील एकाने भरबैठकीत गोंधळ घालून चक्क तहसीलदारांना अरेरावी केली होती. ही घटना ताजी असतानाच दि ३० ऑक्टोबर रोजी जि प बांधकामचे उपविभागीय अभियंता संभाजी अस्वले हे कार्यालयात काम करत असताना एकाने त्यांना दिवाळीसाठी ५० हजार रूपयाची मागणी करीत थेट मारहाण केली. 

या दोन्ही घटनामुळे तालुक्यातील शासकीय कर्मचारी उद्विग्न झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान शुक्रवारी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, पैठण तालुका महसूल कर्मचारी संघटना, तालुका तलाठी संघ, नगर परिषद कर्मचारी संघटना आदीसह पंचायत समिती, पाटबंधारे व विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांची भेट घेऊन कुठलाही हितसंबंध नसताना माहिती अधिकाराचा गैरवापर करून माहिती मागणाऱ्या कार्यकर्त्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले असून बरेच कार्यकर्ते सातत्याने माहिती मागतात व प्रसंगी धमक्या देतात अशा संताप जनक भावना उपविभागीय अधिकाऱ्या समोर मांडून त्यांना निवेदन दिले.

उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली पोलीस प्रशासनाशी चर्चाकर्मचाऱ्यांच्या संतप्त भावना ऐकून घेतल्यानंतर प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील असे आश्वासन उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांनी विविध कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यानंतर पोलीस प्रशासनाशी चर्चा करून या बाबत योग्य दखल घेण्याच्या सूचना दिल्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद