शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

महापालिका निवडणूकीसाठी चार वॉर्डांचा एक प्रभाग करा; पण कधी? उल्लेखच नाही, आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:45 IST

एप्रिल २०२० मध्ये महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाल संपला. पाच वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे.

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी रात्री राज्य शासनाने अखेर आदेश जारी केले. शासन आदेशानुसार छत्रपती संभाजीनगरासाठी नव्याने प्रभाग आराखडा तयार करावा लागेल. चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग तयार करावा, असे शासनाने बजावले असले तरी ही प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण करावी, याचा उल्लेख शासनाने केला नाही. प्रभाग रचना तयार करताना २०११ मधील जनगणना गृहीत धरावी का? की २०२२ मध्ये वाढीव लोकसंख्या गृहीत धरण्यासाठी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी? याबाबत महापालिका अधिकारी संभ्रमात आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने ६ मे २०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका घेण्यासाठी एक महिन्यात अधिसूचना काढावी, चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने आदेश जारी केले. यात अ, ब आणि क वर्ग महापालिकांमध्ये निवडणुका घेण्यासाठी प्रभाग रचना तयार करावी. चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग असेल. ज्या ठिकाणी चार वॉर्डांचा प्रभाग होत नसेल तर किमान तीन किंवा पाच वॉर्डांचा प्रभाग करावा, असे आदेशात म्हटले आहे.

११५ सदस्य संख्याएप्रिल २०२० मध्ये महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाल संपला. पाच वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ११३ वॉर्ड होते. सातारा-देवळाईचा मनपा हद्दीत समावेश झाला. तेथे पोटनिवडणूक घेण्यात आली. तेथून दोन सदस्य नंतर निवडून आले. पालिकेत सदस्य संख्या ११५ होती.२०११ च्या जनगणनेचा आधार घेतला तर ११५ वॉर्डांसाठी २८ प्रभाग ४ तर २९ वा प्रभाग ३ सदस्यांचा करावा लागेल. २०२२ मधील वाढीव लोकसंख्यांचा निकष गृहीत धरला तर १२५ नगरसेवकांसाठी ३० प्रभाग ३१ वा प्रभाग पाच सदस्यांचा करावा लागेल.

इच्छुक खुशमहापालिका निवडणूक लढविण्यासाठी पाच वर्षांपासून इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये मंगळवारी रात्री आनंदाची लाट पसरली. लवकरच निवडणूक होणार म्हणून अनेक इच्छुकांना त्यांचे समर्थक शुभेच्छा देत होते. एका प्रभागाची लोकसंख्या किमान ३० ते ३५ हजार राहील.

‘नगरविकास’चा आदेश प्रथमचमहापालिकेच्या यापूर्वी अनेक निवडणुका झाल्या. प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश पहिल्यांदाच नगरविकास विभागाने काढले. तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेची प्रत निवडणूक विभागाला सादर करावी. पुढील संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया निवडणूक आयोगाप्रमाणे पार पाडण्याचे आदेशित केले आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक 2024