शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वेरूळ घाटात मोठा अपघात टळला; बस रस्त्यावरून घसरली, २४ प्रवासी बालंबाल बचावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 16:48 IST

मागील पाच दिवसात दोन बस व एक ट्रक या घाटात घसरून अपघात झाल्याची माहिती आहे.

- सुनील घोडके

खुलताबाद: जगप्रसिद्ध वेरूळ लेणीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाट पावसाळ्यात धोकादायक बनला आहे. आज सकाळी देखील नंदूरबारला जाणारी एसटी बस खुलताबादनजीक वेरूळ घाटात घसरली. मात्र, दैवबलवत्तर म्हणून बसमधील २४ प्रवासी बालंबाल बचावले आहेत. मागील पाच दिवसात दोन बस व एक ट्रक या घाटात घसरून अपघात झाल्याची माहिती आहे.

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी जी- २० चे शिष्टमंडळ येणार म्हणून लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. डांबरीकरण करून रस्ता गुळगुळीत करण्यात आला. परंतु, अतिप्रमाणात डांबर व केमीकल वापरल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. उन्हाळ्यात देखील हा रस्ता वाहनचालकांना त्रासदायक ठरला. मागील पाच दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने या गुळगुळीत रस्त्यावर वाहने चालवणे धोकादायक ठरत आहे. पावसाच्या पाण्यामुळे वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. 

गेल्या पाच दिवसात दोन बस व एक ट्रक घसरून अपघात झाले आहेत. मागील रविवारी स्मार्ट सिटीबसही घसरून दरीत कोसळता कोसळता वाचली. त्यानंतर शुक्रवारी वेरूळ लेणीसमोर पुलाजवळ आयशर ट्रक घसरला. तर आज सकाळी छत्रपती संभाजीनगर - नंदूरबार बस ( क्रमांक एम एच १४- बी टी २३६७) घाटातील गुळगुळीत रस्त्यावरून घसरली. बस रस्त्याच्या खाली उतरून बाजूच्या खडकामुळे थांबली. यामुळे बसमधील २४ प्रवासी बालंबाल बचावले आहेत. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग विभागाने या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवास्यांनी केली आहे.

रस्त्यावर जास्त डांबर ओतल्याने अपघात वाढले डांबर जास्त प्रमाणात वापरल्याने रस्ता प्रमाणापेक्षा जास्त गुळगुळीत झाल आहे. यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरून वाहने घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्ता धोकादायक बनल्याने याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.- ॲड. कैसरोद्दीन, माजी नगराध्यक्ष ,खुलताबाद 

टॅग्स :AccidentअपघातAjantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबाद