शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या घरातच लेकीचा मृत्यूचा व्यापार! छ. संभाजीनगरात ७० हजारांत गर्भपाताचे पॅकेज, दोन बहिणी, डॉक्टर अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 20:05 IST

राज्यभरात गर्भपातासाठी कुख्यात डॉ. राजपूतचेही कनेक्शन असल्याचा दाट संशय; दोन बहिणीसह सिल्लोडच्या बीएएमएस डॉक्टरला अटक; १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

छत्रपती संभाजीनगर : महिन्याभराच्या अंतराने दुसऱ्यांदा उघडकीस आलेल्या गर्भपाताच्या रॅकेटने शहराला हादरवून टाकले. दोन सख्ख्या बहिणी व एका नर्सने मिळून घरातच विवाहितेचा गर्भपात करणे सुरू केले. दीड वर्षापासून सुरू असलेल्या या रॅकेटचे धागेदोरे रेकॉर्डवरील गर्भपात करणाऱ्या कुख्यात डॉक्टरांपर्यंत पोहोचले असून, तब्बल ७० ते ८० हजार रुपयांचे पॅकेज कुटुंबाला सांगितले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

रविवारी सायंकाळी सातारा परिसरात सातारा पोलिसांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीने गर्भपाताचे मोठे रॅकेट उघडकीस आणले. यात वर्षा बाबासाहेब जाधव व उज्ज्वला विठ्ठल गायकवाड या दोघींना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडे महिला रुग्ण पाठविणाऱ्या डॉ. विकास मिठाराम आहेर (रा. निल्लोड, सिल्लोड) यालाही त्याच्या रुग्णालयातून अटक करण्यात आली. वर्षाची मुख्य साथीदार ज्योती पवार मात्र पसार झाली. पोलिस उपनिरीक्षक निर्मला राख व गोविंद एकिलवाले यांच्या पथकाने तिघांना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले. सहायक सरकारी वकील सविता हिवराळे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. मुसळे यांनी आरोपींना १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

आईच्या घरातच लेकीचा मृत्यूचा व्यापारवर्षा जाधव व उज्ज्वला गायकवाड या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. वर्षा नर्स असून उज्ज्वला अल्पशिक्षित आहे. त्यांची आई परिसरात मसाले विकते. काही महिन्यांपर्यंत उज्ज्वला एका महाविद्यालयात साफसफाईचे काम करत होती; मात्र नंतर तिने बहिणीच्या दुष्कृत्यात सहभागी होत गर्भपातासाठी मदत सुरू केली. शहरात दहा वर्षांपासून सुरू असलेल्या फिरत्या गर्भपात केंद्र चालविणाऱ्या टोळीचा भाग असलेल्या वर्षाने संशय टाळण्यासाठी सातारा गावातील आईच्या घरातच गर्भपात सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.

औषधे आणि हत्यारांचा साठावर्षा व उज्ज्वलाच्या घराच्या झाडाझडतीत परवानाधारक डॉक्टरांसाठी असलेल्या गर्भपाताच्या गोळ्या, वेदनाशामक इंजेक्शन, नर्सिंग कौन्सिलचा परवाना, कात्री, स्टेथॅस्कोप आढळले.- पसार झालेल्या ज्योती पवार (रा. साई विश्व सोसायटी, म्हाडा कॉलनी, देवळाई) हिच्या घरातून २ गर्भपिशवी पाहणी उपकरणे, पॅड, १९ सर्जिकल ग्लोज, २ आयव्ही सेट, सुया, ६ पेक्षा अधिक इंजेक्शने, कॅन्युला फिक्सर, इन्स्ट्रुमेंट ट्रे व मोठ्या प्रमाणात औषधी जप्त करण्यात आली.

ती 'खुनी डायरी' जप्तवर्षाच्या घरातून एक डायरी सापडली. त्यात गर्भपात कसा करायचा, कोणती काळजी घ्यायची, केव्हा कोणती औषधे द्यायची आणि धोका कितपत पत्करायचा, याबाबत मार्गदर्शन होते. संकटकाळात मदत मिळवण्यासाठी काही डॉक्टर व रुग्णवाहिकांचे संपर्क क्रमांकही नोंदवलेले होते.

दुसरी मुलगी नको म्हणून टोकाचे पाऊलरविवारी सापळ्यात सापडलेली गर्भवती महिला सिल्लोड तालुक्यातील आहे. गर्भधारणेनंतर तिच्यावर निल्लोड येथील बीएएमएस डॉ. विकास आहेर यांच्याकडे उपचार सुरू होते. त्यांनी तिला पुढील तपासणीसाठी दुसऱ्या डॉक्टरकडे पाठवले. त्यानंतर तिला ज्योतीकडे पाठवले. नंतर वर्षा तिला घरी घेऊन गेली असताना पोलिसांनी छापा टाकला.

'नकोशी'चा ७० हजारांत सौदागर्भलिंग निदान चाचणी – २० हजारगर्भपात – ३० हजारविल्हेवाट – २० हजारएकूण – ७० हजारकुटुंबाच्या परिस्थितीनुसार या दरात चढउतार होत असल्याची माहिती आरोपींनी दिली.

पुन्हा 'सिल्लोड कनेक्शन' आणि डॉ. राजपूतचा संशयनिल्लोड येथून अटक केलेला डॉ. आहेर बीएएमएस डॉक्टर असून त्याची पत्नीही डॉक्टर आहे. पूर्वी छोटा दवाखाना चालवणाऱ्या आहेरने दोन वर्षांपूर्वी तीन मजली इमारत उभी केली. त्यात पहिल्या दोन मजल्यांवर रुग्णालय व लॅब असून वरच्या मजल्यावर तो राहतो. यापूर्वीच्या गर्भपात प्रकरणांमध्येही धागेदोरे भोकरदन व सिल्लोडपर्यंत पोहोचल्याचे उघडकीस आले होते.

पुढील तपासातील महत्त्वाचे प्रश्न- डॉ. राजपूतचा या टोळीशी संबंध आहे का?- औषधी कोण पुरवित होते?- गर्भाची विल्हेवाट नेमकी कुठे लावली जात होती?- डायरीत नमूद डॉक्टरांची भूमिका काय?

मुकुंदवाडीत कचऱ्यात सापडला गर्भएकीकडे साताऱ्यात गर्भपात रॅकेट उघडकीस आले असताना, अज्ञातांनी अंदाजे चार ते पाच महिन्यांचा गर्भ रस्त्यावर फेकला. ६ एप्रिलला सकाळी ११ वाजता राजनगरात हा गर्भ आढळला. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Abortion racket exposed: Daughter's death trade in mother's house.

Web Summary : A major abortion racket busted in Chhatrapati Sambhajinagar reveals shocking details. Two sisters and a doctor arrested for illegal abortions, charging ₹70,000 per case. The racket operated from the mother's house, preying on families wanting to eliminate female fetuses. Police investigation is underway.
टॅग्स :Abortionगर्भपातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी