शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून कॉलेजमध्ये ‘मजनू’चा धिंगाणा; मोबाईल हिसकावून पळाला, तरुणीस दिली धमकी

By सुमित डोळे | Updated: June 21, 2023 17:31 IST

गावाकडून आलेल्या तरुणाकडून तरुणीस बाहेर येण्यासाठी हट्ट, नकार दिल्याने घातला धिंगाणा

छत्रपती संभाजीनगर : एकतर्फी प्रेमातून गावातील मुलीला भेटण्यासाठी तरुणाने थेट शहरात येऊन ‘तिच्या’ महाविद्यालयात जात भेटण्याचा हट्ट केला. तरुणीने साफ नकार दिल्याने तिचा मोबाइल हिसकावला. आता तुझ्या नावाने आत्महत्या करतो, अशी धमकी देऊन धिंगाणा घातला. १९ जून रोजी भर रस्त्यावर हा प्रकार सुरू होता. ते पाहून स्थानिकांनी धाव घेताच त्याने मोबाइल फेकून पोबारा केला. रोहित सुनील वानखेडे असे या मजनूचे नाव आहे.

मूळची अकोला जिल्ह्यातील असलेली १९ वर्षीय खुशी (नाव बदलले आहे) शहरात एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकते. एकाच गावातील असल्याने रोहित तिच्या ओळखीचा होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून तिचा त्याच्याशी कुठलाही संपर्क नव्हता. रोहित मात्र एकतर्फी प्रेमातून सातत्याने बोलण्याचा प्रयत्न करीत होता. रोहितने सोमवारी सकाळी १० वाजता थेट खुशीचे महाविद्यालय गाठले. तिला कॉल करून भेटण्यासाठी बाहेर बोलावले. खुशी वसतिगृहातून महाविद्यालयाच्या गेटवर आली. तेथे रोहितने तिला सोबत बाहेर जाण्यासाठी हट्ट सुरू केला. खुशीने मात्र त्याला साफ नकार दिला.

मोबाइल हिसकावून पळालाराग आलेल्या रोहितने तिच्यासोबत झटापट करून तिचा मोबाइल हिसकावला आणि पळत सुटला. आजूबाजूच्या नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास येताच काहींनी त्याच्या दिशेने धाव घेतली. पकडले जाण्याच्या भीतीने त्याने मोबाइल फेकून पळ काढला. स्थानिकांनी मोबाइल खुशीला परत दिला. त्यानंतर खुशीने थेट वेदांतनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरून राेहितविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरू असल्याचे उपनिरीक्षक सुधाकर पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद