शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
4
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
5
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
6
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
7
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
8
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
9
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
10
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
11
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
12
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
13
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
14
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
15
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
16
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
17
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
18
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
19
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
Daily Top 2Weekly Top 5

प्रदीप जैस्वालांसोबतची मैत्री जपली; ठाकरेसेनेची उमेदवारी सोडलेले तनवाणी शिंदेसेनेत

By बापू सोळुंके | Updated: November 14, 2024 15:49 IST

किशनचंद तनवाणी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

छत्रपती संभाजीनगर: 'मध्य' मतदारसंघातील हिंदू मतांची विभागाणी टाळण्यासाठी उद्धवसेनेकडून मिळालेली उमेदवारी परत करणाऱ्या किशनचंद तनवाणी यांनी आज गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. काही दिवसापूर्वीच त्यांनी उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हाच ते शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती.

शहरातील औरंगाबाद-मध्य मतदारसंघासाठी शिवसेनेने आमदार प्रदीप जैस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात उद्धवसेनेने जिल्हाप्रमुख किशनंचद तनावणी यांना उमेदवारी दिली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस बाकी असताना तनवाणी यांनी पत्रकार परिषदेत मध्य मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. जैस्वाल हे उमेदवारी मागे घेत नाही आणि आपण उभे राहिल्यास मध्य मतदारसंघातील हिंदू मतांची विभागणी होईल आणि याचा लाभ 'एमआयएम'च्या उमेदवाराला होईल, यामुळे आपण निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. तनवाणी यांच्या या धक्कादायक निर्णयामुळे 'मध्य' मतदारसंघाचा उमेदवार बदलण्याची नामुष्की उद्धवसेनेवर आला होता.

तेव्हा पक्षाने त्यांना तासभरात जिल्हाप्रमुख पदावरुन दूर केले होते. तनवाणी यांनी आठ दिवसापूर्वी उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते शिंदेगटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. या चर्चेवर आज गुरूवारी शिक्कामाेर्तब झाले. तनवाणी यांनी त्यांच्या समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सचीन झव्हेरी, सोमनाथ बोंबले, सुधीर नाईक, आदित्य दहिवाल यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

तनवाणी हे प्रामाणिक मित्रकिशनचंद तनवाणी हे प्रामाणिक मित्र आहेत. ते ज्या पक्षात असतात त्या पक्षाचे ते प्रामाणिकपणे काम करतात. शहराचे हित लक्षात घेऊन त्यांनी उद्धवसेनेने दिलेली 'मध्य' ची उमेदवारी परत केली. त्यासाठी त्यांनी पैसे घेतल्याचा आरोप खोटा आहे. तनवाणी यांच्यामुळे आपली विजयाची लीड आणखी वाढणार आहे. -आ. प्रदीप जैस्वाल, शिंदेसेना उमेदवार मध्य मतदारसंघ

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-central-acऔरंगाबाद मध्यKishanchand Tanvaniकिशनचंद तनवाणीPradeep Jaiswalप्रदीप जैस्वालEknath Shindeएकनाथ शिंदे