शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘मैं नहीं तो कौन बे...’ रॅपचे चाहते म्हणताय हे तर कॉन्फिडन्स बुस्टर; रील्सनंतर आली टॅटूची क्रेझ

By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 5, 2022 13:46 IST

हे रॅप अनेकांचा आत्मविश्वास वाढविणारे ठरल्याने शौकीन आबालवृद्ध हातावर ‘ मैं नहीं तो कौन बे...’ हा टॅटूही काढत आहेत.

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : ‘मैं नहीं तो कौन बे..., ये ये मैं नहीं तो कोन बे... मैं नहीं तो कौन’ या रॅपने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या एकाच गाण्याने सृष्टी तायडे रात्रीतून ‘रॅप स्टार’ झाली आहे. औरंगाबादेतील अनेक युवक-युवतींनी या रॅपवर सोशल मीडियामध्ये ‘रिल’ बनवले असून, तेही तुफान व्हायरल होत आहे. हे रॅप अनेकांचा आत्मविश्वास वाढविणारे ठरल्याने शौकीन आबालवृद्ध हातावर ‘ मैं नहीं तो कौन बे...’ हा टॅटूही काढत आहेत. सृष्टी तायडे या मराठी तरुणीने स्वत: लिहून ‘मैं नहीं तो कौन बे...’ हे रॅप गात आपल्या आवाजाची जादू रॅपप्रेमींवर केली आहे. हे रॅप जंगलात वणवा पसरावा, त्या गतीने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या रॅपची क्रेझ औरंगाबादेतही पाहण्यास मिळते आहे.हे रॅप एवढे लोकप्रिय झाले की, त्याची टाइमलाइन (मुखडा) हातावर गोंदून घेतला जात आहे. औरंगाबादेत रॅपप्रेमी २० वर्षांच्या युवक-युवतीपासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक टॅटू काढून घेत आहेत. यामुळे टॅटू आर्टिस्टला ‘डिमांड’ आली आहे. दररोज नवीन तीन ते चारजण रॅपचे टाइमलाइन हातावर काढून घेत असल्याची माहिती टॅटू आर्टिस्ट सीमा कस्तुरे यांनी दिली.

साक्षी हिवराळे ठरली सुपरहिटऔरंगाबादची लेक व महाराष्ट्राची कराटे चॅम्पियन साक्षी हिवराळे हिने सृष्टी तायडे हिने गायलेल्या ‘मैं नहीं तो कौन बे’ या रॅपची रिल तयार केली. ही रिल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ७३ हजार व्ह्यूज तिला मिळाले. रिल तयार करणारी औरंगाबादेतील साक्षी ही एकटी नसून अनेक तरुणी व तरुणांचे रिल व्हायरल होत आहेत व त्यांनाही मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळत आहेत.

आत्मविश्वास वाढला‘मै नहीं तो कौन बे’ हे रॅप मला खूप आवडले... या पहिल्या टाइमलाइनने माझ्यातील आत्मविश्वास वाढविला... एखादे वाक्य तुमचे आयुष्य घडवू शकते. माझ्या बाबतीतच नव्हे तर अनेक जण असतील त्यांना या रॅपने आत्मबळ, आत्मविश्वास निर्माण करून दिला असेल. यामुळे टाइमलाइनचे टॅटू माझ्या हातावर काढले.- पुनम चोपडा, रॅप, टॅटू प्रेमी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocial Mediaसोशल मीडिया