शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महिला मंडळ म्हणतेय मंदिरात ड्रेसकोड हवा; मंदिर ट्रस्टच्या मते अजून तरी निर्बंधाची वेळ नाही

By संतोष हिरेमठ | Updated: July 7, 2023 13:37 IST

छत्रपती संभाजीनगरात मंदिरांबाहेर ‘ड्रेसकोड’विषयी लागले फलक

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मंदिरांबाहेर लागलेला फलक वाचण्यात भाविक काहीसे मग्न होत आहेत. मंदिरात प्रवेश करताना स्कर्ट-टाॅप, हाफ पॅन्ट, बर्म्युडा, शाॅर्ट्स नको, अशी वेशभूषा नको, अशा आशयांचे हे फलक आहेत. शहरातील १५ ते २० मंदिरांबाहेर शहरातील एका महिला मंडळाने हे फलक लावले आहेत. मात्र, मंदिरात प्रवेश करताना ‘ड्रेस कोड’चे निर्बंध लावण्याची अजून तरी वेळ आलेली नाही, असे मंदिर ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

सिडको हडको माहेश्वरी महिला मंडळाद्वारे समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी एक पाऊल उचलण्यात आले आहे. स्कर्ट टॉप, हाफ पॅन्ट, बर्म्युडा, शॉर्ट्स असे वस्त्र परिधान करून मंदिरात प्रवेश करू नये, यासाठी शहरातील विविध मंदिरांच्या परिसरात फलक लावण्यात आले. मंदिराचे पावित्र्य राखावे म्हणून शहरातील जवळपास १३ मंदिरांच्या परिसरात असे फलक लावण्यात लावण्यात आले आहे. भारतीय वेशभूषेत मंदिरात प्रवेश करावा, असे फलकावर नमूद करण्यात आल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली.

संस्कृती टिकूनआपल्याकडे अजूनही संस्कृती टिकून आहे. नवी पिढीही धार्मिक आहे. मंदिरात कोणीही चुकीचे ड्रेस परिधान करून येत नाही. त्यामुळे मंदिरात ड्रेस कोड लागू केलेला नाही. मंदिराबाहेर पोस्टर लावू दिले.- डाॅ. प्रवीण वक्ते, अध्यक्ष, गजानन महाराज मंदिर ट्रस्ट

अजून तरी गरज नाहीमंदिर व्यवस्थापनाची बैठक झालेली नाही. असे काही करायचे असेल तर बैठक घेऊन त्यात ठराव मांडावा लागतो आणि तो मंजूर करावा लागतो. ड्रेस कोड लागू करण्याची अजून तरी गरज वाटत नाही.- ॲड. नरेंद्र देव, श्रीराम मंदिर, समर्थनगर

पोस्टर्समधून जनजागृतीवर भरमंदिरात भारतीय वेशभूषेत जावे. मंदिर हे श्रद्धास्थान आहे. त्याचे पावित्र्य जपले पाहिजे. देशात अनेक ठिकाणी मंदिरात ड्रेस कोड लागू आहे. पोस्टर्सच्या माध्यमातून आपल्याकडेही त्याविषयी जनजागृती केली जात आहे. मंदिर परिसरात हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.- प्रीती झंवर, अध्यक्ष, सिडको-हडको माहेश्वरी महिला मंडळ

ड्रेसकोड नको; पण मर्यादा पाळावीमंदिरात ठराविक वेशभूषेतच प्रवेश करावा, असे बंधन करता कामा नये; परंतु सर्वसामान्यांना नागरिकांनीही मंदिरात प्रवेश करताना वेशभूषेविषयी मर्यादा पाळली पाहिजे.- श्रद्धा पिंपळे, भाविक

टॅग्स :TempleमंदिरAurangabadऔरंगाबाद