शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

माहेश्वरी समाजातील अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणणार; जिल्हा सभेचा निर्धार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:45 IST

अखिल भारतीय माहेश्वरी महासभा ही १३५ वर्षे जुनी संघटना आहे; चिंतन बैठकीत जिल्हा माहेश्वरी सभेने केला संकल्प

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात माहेश्वरी समाजाचे २८०० कुटुंब आहेत. त्यातील २२ कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे. अशा कुटुंबांचे उत्पन्न वाढवून व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प जिल्हा माहेश्वरी सभेने केला आहे. यास संपूर्ण समाजाने पाठिंबा दिला असून, सर्व मिळून २२ कुटुंबांना आर्थिक चणचणीतून मुक्त करण्यात हातभार लावणार आहेत. जिल्ह्यासाठी हेच मोठे फलित चिंतन बैठकीतून निघाले.

अखिल भारतीय माहेश्वरी महासभेच्या दोनदिवसीय चिंतन बैठकीची रविवारी यशस्वी सांगता झाली. यानिमित्त सायंकाळी आयोजित शेवटच्या सत्रात महासभेचे सभापती संदीप काबरा यांनी ‘समाज संघटना आणि भविष्यातील समस्या’ याविषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, २२ कुटुंबांतील ८ कुटुंबांत कर्ता व्यक्ती नाही. अशांना समाजाने दत्तक घेऊन त्यांचे पुर्नवसन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वेळेस मी छत्रपती संभाजीनगरात येईन तेव्हा हे सर्व २२ कुटुंब समाजाच्या मुख्य प्रवाहात आल्याचे दिसले पाहिजे, असेही काबरा यांनी आवाहन केले.

दिवसभर विविध सत्रांत झालेल्या चिंतन बैठकीत समाजातील मुला-मुलींच्या शैक्षणिक समस्या, लग्नात येणारे अडथळे, भविष्यातील योजना आदी विषयांवर सर्वांगीण चर्चा झाली. तसेच पालकांनी पाल्यांना कसे सांभाळावे, या विषयावरील सत्रालाही चांगला प्रतिसाद मिळाला. उपसभापती अरुण भांगडिया, महामंत्री अजय काबरा, संयुक्त मंत्री जुगलकिशोर लोहिया, प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी, प्रदेश मंत्री सत्यनारायण सारडा, रमेश परतानी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर सोमाणी, अजित नावंदर, संतोष गिलडा, संजय दरक, पुष्पकुमार लड्डा, सतीश लड्डा, राधेश्याम इंदाणी आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

१३५ वर्षांची सर्वांत जुनी संघटनाअखिल भारतीय माहेश्वरी महासभा ही १३५ वर्षे जुनी संघटना आहे. राजकीय पक्षविरहित ही संघटना आहे. समाजाने नोकरी न करता उद्योजक, उत्पादक बनावे व सर्वांना रोजगार द्यावा, असा १९१८ या वर्षी प्रस्ताव पास केला होता. १९२२ मध्ये विधवा विवाहाला परवानगी महासभेने दिली होती. समाज व संघटनेच्या वैभवशाली परंपरेचा उल्लेख बैठकीत करण्यात आला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSocialसामाजिक