शहरं
Join us  
Trending Stories
1
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
2
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
3
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
4
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
5
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
6
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
7
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
8
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
9
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
10
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
11
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
12
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
13
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
14
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
15
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
16
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
17
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
18
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
19
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
20
Astro Tips: राजेशाही आयुष्य जगायचंय? २०२६ सुरु होण्याआधी करा 'हा' प्रभावी उपाय!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात महायुतीला तडे; १६० जागांसाठी १३१२ उमेदवार मैदानात, बंडखोरीचे संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:27 IST

पक्षनेते, पदाधिकाऱ्यांच्या सूचनांना कुणी जुमानले नाही. त्यामुळे महायुतीत बंडखोरी मोठ्या प्रमाणात होतेय.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ६ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायतीच्या निवडणूक मैदानात उमेदवार ‘उदंड जाहले’ आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ६९७ अर्ज नगरसेवकपदासाठी, तर ५३ अर्ज नगराध्यक्षपदासाठी आले. एकूण १० ते १७ नोव्हेंबरपर्यंत नगरसेवकपदासाठी १ हजार ३१२ अर्ज आले असून, नगराध्यक्षपदासाठी ८८ जण रिंगणात येण्यासाठी उत्सुक आहेत. या निवडणुकीत महायुतीला तडे गेले असून, सोयीनुसार खेळ जमविण्याचा प्रयत्न उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झाल्यामुळे महायुतीमधील सर्व घटक पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे स्पष्ट झाले.

७ न.प.मध्ये १६० नगरसेवक पदांच्या जागांसाठी १३१२ उमेदवार मैदानात उतरले असून ७ नगराध्यक्षपदासाठी ८८ उमेदवार भाग्य आजमावणार आहेत. २६ तारखेपर्यंत माघार घेणाऱ्यांच्या संख्येवर काही ठिकाणी युती होईल, अशी आशा महायुतीला आहे. पैठणमध्ये सर्वाधिक २९० उमेदवार नगरसेवकपदासाठी आणि १४ उमेदवार नगराध्यक्षपदाच्या मैदानात आहेत. उमेदवारांच्या इच्छेपुढे कुणाचेच काही चालले नाही. पक्षनेते, पदाधिकाऱ्यांच्या सूचनांना कुणी जुमानले नाही. त्यामुळे महायुतीत बंडखोरी मोठ्या प्रमाणात होतेय.

१० ते १७ नोव्हेंबरपर्यंत आलेले उमेदवारी अर्ज....नगर परिषद........उमेदवार नगरसेवक....नगराध्यक्षसिल्लाेड...............२२९...............१७कन्नड.........१९२..........................०६पैठण............२९०.........................१४वैजापूर..........२१०....................०८गंगापूर.............१२८...............१५खुलताबाद..........१२६.............१६फुलंब्री................१३७............१२एकूण................१३१२...............८८

या तारखा आहेत महत्त्वाच्या....- उमेदवार यादी प्रसिद्धी १८ नोव्हेंबर- माघार, अर्ज छाननी, चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्धी : २६ नोव्हेंबर- मतदान २ डिसेंबर- मतमोजणी ३ डिसेंबर

सात ठिकाणची परिस्थितीसिल्लोडमध्ये भाजप व शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र लढण्याचे जवळपास निश्चित आहे. फुलंब्रीतही भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची चिन्हे आहेत. कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत भाजपची युती झाली, असून, शिंदेसेनेने स्वतंत्र उमेदवार दिले. येथे नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार असणार आहे. वैजापूरमध्येही राष्ट्रवादी व भाजपची युती झाली असून येथे भाजपचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी असेल. गंगापूर व खुलताबादेत भाजप, शिंदेसेना स्वबळावर लढतील. पैठणमध्येही महायुतीतील सर्व पक्ष स्वबळावर लढतील.

भाजप आणि शिंदेसेनेत फाटलेजिल्ह्यात भाजप आणि शिंदेसेनेत कुठेही युतीचा मेळ जमलेला नाही. सातही नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीतील चारही पक्ष कुठेही एकत्र आलेले नाहीत. भाजप दोन ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युतीत आहे. बाकी ठिकाणी स्बळावर लढेल.

तर भाजप स्वबळावरकन्नड, वैजापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली आहे. गंगापूर-खुलताबाद भाजप स्वबळावर लढणार आहे. कन्नडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला नगराध्यक्षपद दिले असून वैजापूरमध्ये भाजपचा उमेदवार असेल. शिंदेसेना स्वतंत्र आहे.-संजय खंबायते, जिल्हाध्यक्ष भाजप

आमनेसामनेची शक्यता....अर्ज भरण्यासाठी १७ नोव्हेंबर या शेवटच्या दिवसापर्यंत शिंदेसेनेची महायुतीतील कोणत्याही पक्षासोबत युती झाली नाही. सरकारमध्ये महायुती म्हणून एकत्र असले तरी न.प. निवडणुकीत आमनेसामने येण्याची शक्यता आहे. अर्ज परत घेण्याची मुदत संपल्यानंतरच युतीसंदर्भात बोलता येईल,- संदीपान भुमरे, खासदार

महाविकास आघाडी एकत्र - खैरेमहाविकास आघाडीतील उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) हे तीन पक्ष निवडणुकीला एकत्र सामोरे जात आहेत. उद्धवसेनेने सिल्लोड, गंगापूर, पैठण, फुलंब्री आणि कन्नडमधून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिले आहेत, तर काँग्रेसला वैजापूर आणि खुलताबादचे नगराध्यक्षपद देण्यात आल्याची माहिती उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Cracks in Mahayuti in Sambhajinagar; Rebellion Looms Over Candidate Overload

Web Summary : Sambhajinagar's local elections see Mahayuti alliance strained. Over 1300 candidates vie for 160 council seats, hinting at rebellion as parties struggle to form coalitions. BJP aligns with NCP (Ajit Pawar) in some areas, while others fight independently. Final alliances depend on withdrawals.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMahayutiमहायुतीMunicipal Corporationनगर पालिका