शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; पण अभियंता, लाईनमन 'पदा'वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:50 IST

महावितरणच्या पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत ठाण्यात कसून चौकशी

छत्रपती संभाजीनगर : शेतात पेरणीसाठी गेलेल्या कचरू जनार्दन दहीहंडे (वय ५०) व किरण ऊर्फ बाळू जगन्नाथ दहीहंडे (३०) या काका-पुतण्याचा वीजप्रवाहित तारांना स्पर्श होऊन शेतातच अंत झाला. सोमवारी सायंकाळी सहा वाजता चिकलठाणा परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेप्रकरणी चौकशी करण्यात आली. मंगळवारी पहाटे चार वाजता महावितरणचे मुख्य अभियंता, संबंधित लाईनमन, व्हॉट्सॲप (७०६६०४२२५०) क्रमांक असलेला कर्मचारी यांच्यावर, व्हिडीओ पाठवूनही तसेच कारवाई न केलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या महिनाभरापासून महावितरणकडे लोंबकळणाऱ्या या तारा हटविण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून मागणी केली जात होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सोमवारी कचरू व किरण दहीहंडे दोघेही पेरणीच्या पूर्वतयारीसाठी शेतात गेले होते. १५ मे पासून वीजप्रवाह नसलेल्या तारांमध्ये सोमवारीदेखील वीजप्रवाह नसावा, असे वाटल्याने कचरू व किरण यांनी त्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात अचानक वीजप्रवाह उतरलेला होता. तारांना स्पर्श करताच दोघेही गंभीररीत्या भाजून शेतातच गतप्राण झाले.

महावितरणच्या बेजबाबदारपणाचा घटनाक्रम-कचरू दहीहंडे यांच्या कुटुंबाची चिकलठाण्याच्या गट क्रमांक ६६८ मध्ये साडेपाच एकर शेती आहे. त्यांच्या शेजारील हरीशचंद्र त्रिभुवन यांची शेतजमीन किरण यांनी बटाईने घेतली हाेती. त्यांच्या शेतातून विमानतळासाठी १५ वर्षांपूर्वी अतिउच्च दाबाची वीजवाहिनी गेली आहे.-त्याखालून थ्रीफेज लाईन गेली असून, १९ मे रोजी वादळात त्यावर झाड कोसळून विजेचे खांब कोसळून तारा लोंबकळल्या होत्या.-दहीहंडे कुटुंबाने महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही बाब कळवली. व्हॉट्सॲपवर व्हिडीओदेखील पाठवले.- तीन दिवसांनी अधिकारी, लाईनमनने भेट देऊन वादळात पडलेला विजेचा खांब काही अंतरावर उभा केला. मात्र, अतिउच्च दाबाचे खांब दुरुस्त केले नाहीत. त्यानंतर वारंवार दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला. मात्र, त्यांना बेजबाबदार महावितरणने प्रतिसाद दिला नाही.

एक कलम टाळले-सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा भाग कोसळून दोन महिलांच्या मृत्यू प्रकरणात क्रांतीचौक पोलिसांनी बीएनएस १०५ (सदोष मनुष्यवध),१२५ (अ), १२५ (ब) (इतरांची जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती) आणि ३(५) (समान उद्देश साध्य करण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्तींनी केलेली कृती) या कलमांतर्गत सहाजणांवर गुन्हा दाखल केला.-एमआयडीसी सिडको पोलिसांनी शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात १२५ (अ, ब) हे कलम टाळून बीएनएस १०५ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

रात्री उशिरापर्यंत पाच अधिकारी, कर्मचारी ठाण्यातदहीहंडे कुटुंबावर ओढवलेल्या संकटानंतर ग्रामस्थ, नातेवाइकांनी महावितरणविरोधात मंगळवारीदेखील संताप व्यक्त केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी दुपारीच महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ठाण्यात बोलावले. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू होती.

महावितरणचे मुख्य अभियंता कोण आहेत?- मुख्य अभियंता पवनकुमार कछोट हे सध्या वैद्यकीय रजेवर.- सध्या प्रभारी मुख्य अभियंता महेश पवार हे आहेत.- अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे यांनी काही दिवस प्रभारी मुख्य अभियंतापदाचा पदभार सांभाळला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी