शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा ७४० ग्राहकांना ‘शाॅक’, थकबाकीमुळे वीजपुरवठा केला खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:03 IST

धडक मोहीम सुरू : वीजबिल वसुलीसाठी महावितरणचे मुख्य अभियंता उतरले रस्त्यावर

छत्रपती संभाजीनगर : वीजबिल वसुलीसाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. या धडक मोहिमेत छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट हे स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. थकबाकीमुळे सोमवारी दिवसभरात शहरातील ७४० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अनेक ग्राहकांनी लगेचच बिल भरून वीजपुरवठा सुरळीत करून घेण्यावर भर दिला.

वीज बिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरण आर्थिक अडचणीत आलेली आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्यासह सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, तांत्रिक कर्मचारी तसेच विविध संवर्गातील संपूर्ण कार्यालयीन अधिकारी-कर्मचारीही मोहिमेत प्रत्यक्ष ग्राहकांकडे भेट देऊन थकबाकी वसुलीसाठी जात आहेत. अनेक ग्राहक तातडीने बिल भरत आहेत, तर जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

अनधिकृतरीत्या वीज वापरली तर कारवाईथकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही कुणी ग्राहक अनधिकृतरीत्या वीज वापरत असेल, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तरी वीजग्राहकांनी आपली वीज बिलांची थकबाकी व चालू बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

नक्षत्रवाडी, सिटी चौकात पोहोचले मुख्य अभियंताशहरात नक्षत्रवाडी व सिटी चौक शाखा कार्यक्षेत्रात सोमवारी राबवण्यात आलेल्या विशेष वसुली मोहिमेत मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, वरिष्ठ व्यवस्थापक लक्ष्मीकांत राजेल्ली यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही एकाच वेळी या मोहिमेत ग्राहकांना भेट देऊन वीजबिलांची वसुली केली. ग्राहकांना वीज बिलाबाबत असलेल्या शंकांचे तत्काळ निरसन तसेच आवश्यक त्या ठिकाणी बिल दुरुस्त करून त्यांना जागेवरच ऑनलाइन भरण्यास महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रोत्साहित केले.

काही ग्राहकांचे थेट मीटरच काढलेज्या ठिकाणी ग्राहकास वीजबिल ऑनलाइन भरण्यास अडचण होती किंवा वीजबिल भरणा केंद्र जवळ नव्हते त्यांच्याकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बिलाची रक्कम स्वीकारून ॲपद्वारे वीजबिल भरणा करून घेतला. त्यांना बिल भरल्याचा तत्काळ मोबाइलवर एसएमएस पाठवण्यात आला. अनेक दिवसांपासून बिले न भरणाऱ्या काही ग्राहकांचे थेट मीटरच काढून आणण्यात आले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmahavitaranमहावितरण