शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महावीर चौक ते स्टेशनकडे जाणारा रस्ता बंद; रामकथेसाठी तीन दिवस वाहतूक मार्गात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 14:10 IST

कथा ऐकण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर : अयोध्यानगरी मैदानावर धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर धाम) यांची रामकथा ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान होत आहे. या काळात सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये शहर पोलिसांनी बदल केले आहेत.

कथा ऐकण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. महिला, लहान मुले, पुरुष व वयोवृद्ध सहभागी होणार असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ होऊन गैरसोय होऊ नये म्हणून हा बदल करण्यात आल्याचे शहर वाहतूक पोलिसांनी कळविले आहे.

वाहतुकीस बंद असलेले मार्गमध्यवर्ती बसस्थानकाकडून महावीर चौक उड्डाणपुलावरून रेल्वे स्थानकाकडे जाणारा व येणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल. त्याशिवाय पंचवटी ते रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखालील रस्ता, रेल्वे स्टेशन ते पंचवटी चौकाकडे उड्डाणपुलाखालून येणारा रस्ता, कोकणवाडी ते रेल्वे स्टेशन जाणाऱ्या रोडवरील बन्सीलालनगर कमानीपासून ते अयोध्यानगरीपर्यंत जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

बंद असलेल्या मार्गासाठी पर्यायी रस्ताकार्तिकी हॉटेल चौकाकडून महावीर चौकाच्या उड्डाणपुलावरून रेल्वे स्टेशनकडे जाणारी वाहने बाबा पेट्रोल पंप, जिल्हा न्यायालय, कोकणवाडीमार्गे किंवा क्रांती चौकमार्गे रेल्वे स्टेशनकडे जातील. रेल्वे स्टेशनकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे येणारी वाहने ही रेल्वे स्टेशन, कोकणवाडी, जिल्हा न्यायालय, सावरकर चौक, कार्तिकी हॉटेल चौकमार्गे येतील. लोखंडी पुलाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणारी वाहने ही लोखंडी पूल, पंचवटी चौक, कोकणवाडी चौकमार्गे रेल्वे स्टेशनला जातील.

तगडा बंदोबस्तधीरेंद्र शास्त्री यांच्या रामकथेला सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामध्ये एक सहायक पोलिस आयुक्त, ९ पोलिस निरीक्षक, १७ सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, १५८ पोलिस कर्मचारी आणि १५९ होमगार्ड सुरक्षेसाठी तैनात केले आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbageshwar dhamबागेश्वर धाम