शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या रक्तात फुले-आंबेडकर, भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करण्यास तयार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 13:11 IST

मंत्री चंद्रकात पाटील यांचा वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

औरंगाबाद: महापुरुषांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्यावरून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राज्यभर जोरदार निदर्शने होत आहेत. यावर मंत्री पाटील यांनी आज पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. जर 'भिक' या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे, असे मोठे वक्तव्य मंत्री पाटील यांनी आज केले. 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी पैठण येथे संतपिठाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सरकारी मदतीचा संदर्भ देत असताना महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केले. कर्मवीर भाऊराव पाटील- महात्मा फुले - बाबासाहेब आंबेडकर यांनी भिक मागून शाळा चालवल्या या वक्तव्यावर आक्षेप घेत राज्यभर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आंदोलने, निदर्शने सुरु झाली. दरम्यान, आज सकाळी मंत्री पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी दर्शवत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

ते म्हणाले, माझ्या रक्तात आंबेडकर-फुले आहेत. मी त्यांच्याबद्दल काहीही चुकीचा बोललो नाही. माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदरच आहे. माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे. तरी देखील 'भिक' या शब्दावरून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे, अशी भूमिका मंत्री पाटील यांनी घेतली आहे. या भुमिकेनंतर आता मंत्री पाटील यांच्या विरोधातील निदर्शने शांत होतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी तक्रार दाखलमहात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या, असे वादग्रस्त विधान करून महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात शहरातील वेदांत नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, शहरात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात शहर काँग्रेस, रिपब्लिकन सेनेने आक्रमक प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :BJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलAurangabadऔरंगाबाद