शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात १३ जुलै रोजी मनोज जरांगे यांची महासंवाद रॅलीचे आयोजन

By बापू सोळुंके | Updated: June 21, 2024 20:23 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या लढ्याला मराठा समाजाने पूर्ण ताकदीनिशी उभे राहण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला सगे-सोयऱ्याचे आरक्षण देणारा कायदा करावा आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकाला १३ जुलैपर्यंत  मुदत दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने १३ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरात जरांगे यांची महासंवाद रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.

सकल मराठा समाजाची जिल्हास्तरीय बैठक शुक्रवारी दुपारी हर्सूल येथील एका मंगलकार्यालयात झाली. या बैठकीला जिल्ह्यातील विविध तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या लढ्याला मराठा समाजाने पूर्ण ताकदीनिशी उभे राहण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला. १३ जुलै रोजी राजमाता जिजाऊं चौक(केम्ब्रीज चौक)ते क्रांतीचौक अशी महासंवाद रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाने महारॅलीत सहभागी व्हावे, यासाठी जास्तीत जास्त गावांत जनजागरण करण्याची जबाबदारी तालुका  आणि  विविध सर्कलमधील स्वयंसेवक आणि पदाधिकाऱ्यांवर यावेळी सोपविण्यात आली. महारॅलीकरीता येणाऱ्या नागरीकांची पिण्याच्या पाण्याची सुविधा केली जाईल. तसेच वाहनतळाची माहिती लवकरच दिली जाणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.

या बैठकीसाठी प्रा.चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, अप्पासाहेब कुढेकर, सतिश वेताळ, सुनील कोटकर, सचीन हावळे, मनोज गायके, प्रभाकर मते, पंढरीनाथ गोडसे, गणपत म्हस्के, भारत कदम, राजीव थिटे, अजय गंडे,रवींद्र नीळ, गणेश मोटे , अजय पाटील राजू मोहिते , डॉ. मनीषा मराठे, रेखा वाहटुळे, कल्पना साखळे, शारदा शिंदे, दिपाली पाटील यांच्यासह शेकडो समाजबांधवांची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण