शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचा कृष्णा उत्तरेत मदतीला धावला, ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये ३ दिवस बोगद्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 06:19 IST

उत्तराखंडमधील बोगद्यात सुरू असलेल्या ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये पुण्यातील एका कंपनीत सीनिअर ॲप्लिकेशन इंजिनीअर असलेला पैठण तालुक्यातील वाहेगावचा कृष्णा दळे हा पाच जणांच्या टीमसोबत तीन दिवस बोगद्यात काम करीत होता.

- राम शिनगारेछत्रपती संभाजीनगर :  बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी जगभरातील तज्ज्ञ, तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत होती. या ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये पुण्यातील एका कंपनीत सीनिअर ॲप्लिकेशन इंजिनीअर असलेला पैठण तालुक्यातील वाहेगावचा कृष्णा दळे हा पाच जणांच्या टीमसोबत तीन दिवस बोगद्यात काम करीत होता.

कामगारांना बाहेर काढण्यासाठी केंद्र शासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत होते. त्यासाठी जगभरातून तज्ज्ञांना आमंत्रित केले. त्यात पुण्यातील सुरेश इंदू लेझर कंपनीच्या टीमलाही पाचारण करण्यात आले. त्यात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वर्धमान शाह, टेक्निकल संचालक प्रफुल्ल जोशी, सीनिअर ॲप्लिकेशन इंजिनीअर कृष्णा दळे, संदीप कुमार, मयूर वडमारे यांचा समावेश होता.  लेझर कटिंग मशिनने ब्लेड कट करण्यासाठीची महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी केली. ही संपूर्ण टीम तीन दिवस बोगद्यातच मुक्कामाला होती, अशी माहिती अभियंता कृष्णा दळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

अतिशय गरिबीत शिक्षण- पैठण तालुक्यातील वाहेगाव येथील रहिवासी असलेल्या कृष्णा भाऊसाहेब दळे यांनी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात २०१३ ते २०१७ या कालावधीत मॅकेनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.-त्यांचे वडील कुंभार (मातीकामाचा) पारंपरिक व्यावसायिक असून, त्यांची दीड एकर शेती आहे. कृष्णा हा महाविद्यालयातही टॉपर होता. -त्यांच्या कामगिरीबद्दल प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, उपप्राचार्य डॉ. देवेंद्र भुयार, विभागप्रमुख डॉ. रामचंद्र चोपडे, प्रा. सचिन लहाने यांनी त्यांचे अभिनंदन केले.

कृष्णाचा अभिमान वाटतोसीएसएमएसएस छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या पहिल्या बॅचचा कृष्णा दळे हा विद्यार्थी आहे. त्यांनी या माेहिमेत खारीचा वाटा उचलून जिल्ह्यासह महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. त्यांचा अभिमान वाटतो.    - पद्माकरराव मुळे, सचिव, सीएसएमएसएस संस्था

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडMaharashtraमहाराष्ट्रAurangabadऔरंगाबाद