शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

Maharashtra Election 2019: शहरासाठी करणार काय? जाहीर सभांमध्ये स्थानिक मुद्दे गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 16:56 IST

उमेदवारही आपल्या मतदारसंघातील काही मोजक्याच मुद्यांवर छोटेखानी सभांमध्ये भाष्य करीत आहेत.

ठळक मुद्देशहराच्या सर्वांगीण विकासाकडे ‘राजकीय’ मौन.मागील ३० वर्षांमध्ये एकाही शहर विकास आराखड्यावर काम झाले नाही.शहरात पर्यटन उद्योगाला वाव मिळावा यादृष्टीने कोणत्याही उपाययोजना नाहीत.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता फक्त सात दिवस उरले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सभांवर भर दिला आहे. आतापर्यंत झालेल्या सभांमध्ये ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील मुख्य प्रश्नांना बगल देण्यात आली आहे. राजकीय नेते राष्ट्रीय, राज्यस्तरीय विषयांना स्पर्श करीत आहेत. आमच्या पक्षाचे उमेदवार शहरातील तिन्ही मतदारसंघांतून निवडून आल्यास काय करणार? हे ठोसपणे कोणीही सांगायला तयार नाही. उमेदवारही आपल्या मतदारसंघातील काही मोजक्याच मुद्यांवर छोटेखानी सभांमध्ये भाष्य करीत आहेत.

स्मार्ट सिटीत निवड झालेल्या औरंगाबाद शहराला असंख्य प्रश्न भेडसावत आहेत. यातील अनेक प्रश्न महापालिकेशी निगडित असल्याचे सांगून आमदार, खासदार नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करीत असतात. दर पाच वर्षांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष प्रचाराचा धुराळा उडवितात. मतदारही आपल्या हक्काचा प्रतिनिधी विधानसभेत पाठवितात. नंतर पाच वर्षे काहीच होत नाही. 

२ आॅक्टोबरला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आमखास मैदानावर पहिली सभा घेऊन शहरात प्रचाराचा नारळ फोडला होता. ओवेसी यांनी तब्बल ३८ मिनिटे भाषण केले होते. त्यातील २२ मिनिटे ते महात्मा गांधी, नथुराम गोडसे यांच्यावर बोलत होते. औरंगाबाद शहरातील एकाही मुख्य समस्येवर त्यांनी भाष्य केले नाही. शहरातील तीन मतदारसंघांत माझे उमेदवार निवडून आल्यावर काय करतील यावर अवाक्षरही काढण्यात आले नाही. याचपाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सांस्कृतिक मंडळावर सभा झाली. त्यांनीही शहराच्या समस्यांवर विशेष भाष्य केले नाही. महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता असताना शहराची दुर्दशा काय हे सर्वश्रुत आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत पाणी प्रश्नावरून शिवसेना उमेदवाराची काय अवस्था झाली, हेसुद्धा औरंगाबादकरांनी पाहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्सूल गावात एक छोटेखानी सभा घेतली. या सभेतही त्यांनी पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले. भाजपचे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघासाठी मुकुंदवाडीत दोन दिवसांपूर्वी सभा घेतली. या सभेतही त्यांनी राष्ट्रवादी, राज्यस्तरीय विषयांवरच भाष्य केले.

शहरातील प्रमुख गंभीर समस्या कोणत्या?1.मागील ३० वर्षांमध्ये एकाही शहर विकास आराखड्यावर काम झाले नाही. अरुंद रस्ते, अतिक्रमणे, वाहतूक कोंडी, पार्किंगचा अभाव.2. शहरात पर्यटन उद्योगाला वाव मिळावा यादृष्टीने कोणत्याही उपाययोजना नाहीत. पर्यटनस्थळांवर मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव.3. शिवाजीनगर उड्डाणपुलाचा प्रश्न दहा वर्षांपासून रेंगाळला आहे. हा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी एकाही राजकीय पक्षाची इच्छाशक्ती नाही.4. शहरात महिला, पुरुषांसाठी शौचालयांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. संपूर्ण शहराला भेडसावणाऱ्या या समस्यांकडे लक्ष देणार कोण?5.घाटी रुग्णालय सोडले तर एकही मोठा दवाखाना शहरात नाही. सर्व रुग्णांचा ताण घाटीवर वाढतोय.6.सिडको-हडकोसह जुन्या शहरात आजही सातव्या दिवशी पाणीपुरवठा होतो.7.शहरात मागील काही महिन्यांत खून, चोऱ्या, नशेच्या  गोळ्यांची विक्री, मंगळसूत्र पळविण्याच्या घटनांमध्ये आमूलाग्र वाढ झाली आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबादaurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्व