शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

'खाम नदीचे प्रदूषण रोखा';पर्यावरणप्रेमींकडून औरंगाबाद शहराचा 'पर्यावरण जाहीरनामा' तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 19:57 IST

पर्यावरणप्रेमी नागरिक, अभ्यासकांच्या चर्चेतील मुद्यांचे संकलन

ठळक मुद्देऔरंगाबाद कनेक्ट टीम आणि स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था यांचा पुढाकार

औरंगाबाद : औरंगाबाद कनेक्ट टीम आणि स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद शहराचा पर्यावरण जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. खाम नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाय करणे, वृक्ष संवर्धन, स्वेच्छा निधीपैकी दरवर्षी किमान १० टक्के निधी पर्यावरणविषयक कामांसाठीच खर्च करणे बंधनकारक करावे, आदी मुद्यांचा त्यात समावेश आहे.

पर्यावरणप्रेमी नागरिक आणि अभ्यासकांच्या चर्चेतून हा पर्यावरण जाहीरनामा तयार झाला आहे. औरंगाबादच्या सर्व मतदारसंघांतील उमेदवारांना तो दिला जात आहे. सोबतच उमेदवारांनी याचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात करण्याची विनंती करण्यात येत आहे. निवडणुकीनंतर तिन्ही मतदारसंघांतील नवनिर्वाचित आमदारांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. 

जाहीरनाम्यात वीजपुरवठा केबल पूर्णत: भूमिगत करण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाकडे प्रस्ताव आणि पाठपुरावा, वृक्षतोडीवर निर्बंध घालण्यासाठी कठोर कायदे करण्यासाठी पाठपुरावा आमदारांनी करावा, दरवर्षी लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात किमान २०० वृक्ष लावून त्यांचे संगोपन करावे, दक्षिण भागातील जैवविविधता धोक्यात येऊन आॅक्सिजन हब संपुष्टात येत आहेत. यासाठी विशेष लक्ष देणे, आदी बाबींचा  समावेश आहे.

जाहीरनाम्यातील काही मुद्दे - खाम नदीचे प्रदूषण तात्काळ रोखण्यासाठी उपाययोजना करणे. - खाम नदीतील अतिक्रमणे हटवणे. नदी काठावर वृक्ष लागवड करणे.- सुखना नदीत सोडले जाणारे सांडपाणी थांबवणे.- कचरा संकलन ते प्रक्रिया याची पूर्ण माहिती नागरिकांना जाहीर करणे.- नहर-ए-अंबरी व अन्य पुरातन नहरींच्या संवर्धनासाठी योजना आखणे. - पाणी वापर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारला आग्रह धरणे.- जलसंवर्धनासाठी निधी मिळविण्यासह विहिरी, बारवांचे पुरुज्जीवन.- सर्व कारखान्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अनिवार्य करणे.- दरवर्षी पर्यावरण वस्तुस्थिती अहवाल जाहीर करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रवृत्त करणे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमAurangabadऔरंगाबाद