शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : खंडपीठातून सात उमेदवारांनी याचिका घेतल्या मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 18:28 IST

याचिकांवर न्या. रवींद्र व्ही. घुगे यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. 

ठळक मुद्देखंडपीठाचा याचिका मंजूर करण्यास नकार

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीतील इच्छुकांचे उमेदवारी अर्ज विविध कारणांमुळे छाननीत बाद केल्याच्या सहायक निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या ८ याचिकांवर सोमवारी औरंगाबाद खंडपीठात न्या. रवींद्र व्ही. घुगे यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. खंडपीठाने याचिका मंजूर करण्यास नकार दिल्यामुळे ७ याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिका मागे घेतल्या. याचिका मागे घेणाऱ्यांत काँग्रेसचे रमेश गायकवाड यांच्यासह अपक्ष सूर्यकांता गाडे व मनसेचे अभिजित अधिकारी यांचा समावेश आहे. 

रविवारी (दि.६) दाखल झालेल्या या याचिकांवर सोमवारी दोन सदस्यीय (डिव्हिजन बेंच) खंडपीठापुढे सुनावणी होणार होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘अपिलेट साईड रुल्स’ नुसार सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकांवर एक सदस्यीय खंडपीठापुढे (सिंगल बेंच) सुनावणी होऊ शकते, असे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. ए. एस. किलोर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केल्यानंतर वरील याचिकांवर न्या. रवींद्र व्ही. घुगे यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. 

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश लक्ष्मण गायकवाड, औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सूर्यकांता गंगाधर गाडे आणि गंगापूर मतदारसंघातील मनसेचे अभिजित जयप्रकाश अधिकारी यांच्यासह अहमदनगर, नांदेड आणि जळगाव मतदार संघातील अशा ७ उमेदवारांनी याचिका मागे घेतल्या.

निवडणूक प्रक्रिया  सुरू झाल्यानंतर हस्तक्षेपास प्रतिबंधकेंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्व प्रतिवादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने अ‍ॅड. अलोक शर्मा यांनी बाजू मांडली. त्यांनी प्रत्येक इच्छुक उमेदवारांचा अर्ज कोणत्या कारणामुळे बाद करण्यात आला हे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्यघटनेच्या धारा ३२९(बी) नुसार तसेच लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १००(सी) नुसार निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नाही. केवळ निवडणुकीनंतर ‘निवडणूक याचिका’ दाखल करणे हाच एक पर्याय असल्याचे अ‍ॅड. शर्मा यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ